AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर होते क्रिकेटप्रेमी, विराट कोहलीशी होतं खास कनेक्शन

नाना पाटेकर क्रिकेटप्रेमी होते. त्यांचं विराट कोहलीशी खास कनेक्शन होते. विराट कोहली लवकर बाद झाल्यावर त्यांना जेवणही करत नव्हते.

नाना पाटेकर होते क्रिकेटप्रेमी, विराट कोहलीशी होतं खास कनेक्शन
nana patekar
| Updated on: Oct 08, 2026 | 9:06 AM
Share

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांचे निधन झालं आहे. पाटेकरांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांना गोव्यातील निवासस्थानी कार्डियक अरेस्ट आला. त्यानंतर मेडिकल पथकाला बोलवण्यात आले. डॉक्टर आले, तोपर्यंत ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना 45 मिनिटे वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सकाळी 5.20 वाजता मेडिकल टीमने मृत घोषित केले.

नाना पाटेकर यांचे पूत्र मल्हार पाटेकर यांनीही त्यांचे निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मल्हार त्यावेळी पुण्यात होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर मल्हार हे गोव्यासाठी रवाना झाले. सध्या माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोवा पोहचल्यानंतर संपूर्ण माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाना पाटेकर हे उत्कृष्ट अभिनेते होते. तसेच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी 2015 साली दिलेल्या एका मुलखातीत बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्यावेळी लहान असताना चांगला क्रिकेटर असल्याचे सांगितले होते. तसेच ऑफ स्पिनर असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पाटेकर यांनी जुन्या आठवणी सांगताना म्हटलं की, मी लहानपणी ऑफ स्पिनर होतो. गरीब घरात जन्माला आल्याने क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्याचे पैसे नव्हते. त्यामुळे शिवाजी पार्कात जायचो. तिथे काही नेट प्रॅक्टिस करायचे. त्यांना बॉलिंग करायचो. आजही 10 दिवस सराव केला तर चांगली बॉलिंग करू शकतो. आजही माझ्यात एक क्रिकेटर दडला आहे’.

नाना पाटेकर यांचा आवडता क्रिकेटपटू हा विराट कोहली होता. सामन्यात विराट कोहली लवकर बाद झाल्यावर त्यांना जेवण्याचंही मन व्हायचं नाही. नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. पाटेकर म्हणायचे, एखाद्या क्रिकेटचा खेळ पाच दिवस चालतो. तर कलाकाराचं काम दीड ते दोन वर्ष चालतं. दोन्ही परीक्षासारखेच आहे. यात शेवटी जनताच निर्णय घेते. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनृष्टीत खळबळ उडाली आहे. ते अभिनय आणि डॉयलॉगसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या सिनेमातील अनेक डायलॉग प्रसिद्ध झाले. परंतु त्यांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर होतं.

Follow Us
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?