AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करुन ठेवलेत, नानांचा काळीज चिरून टाकणारा Video

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली देताना एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करुन ठेवलेत, नानांचा काळीज चिरून टाकणारा Video
Nana PatekarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 2:58 PM
Share

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकजण नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉलिवूडचे इतर अनेक तारे सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. याच दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली देताना एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नाना मृत्यूविषयी बोलताना दिसत आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते, मला माहिती आहे आज ना उद्या मला जायचे आहे. त्यासाठी 12 मण लाकडे लागणार आहेत. तेवढीच लागतील… हिच माझी शेवटची संपत्ती असणार आहे. बाळा मी माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करुन ठेवली आहेत. ती सगळी लाकडे सुकलेली आहेत, त्यातच मला जाळायचं आहे, ओली लाकडं अजिबातच वापरु नका. नाहीतर खूप धूर होईल… मित्र-मंडळी, शेजारी-पाजारी सगळेच जमा होतील. त्यांच्या डोळ्यांत धूर जाईल, डोळ्यातून पाणी येईल त्यांच्या… आणि माझ्या मृत्यूनंतर गैरसमज होईल की, हे सगळे माझ्यासाठीच रडताय आहेत. कमीत कमी मी मेल्यानंतर तरी गैरसमज नकोत असे बोलताना दिसत आहे.

तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी, “हो, कोणालाच अमरत्व नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे… पण तरीही, त्यांच्यासारख्या कणखर माणसासोबत असं काहीसं इतक्या अचानक घडू शकतं, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांचं हृदय त्यांना दगा देऊन गेलं याचा मला प्रचंड राग येतोय आणि अभिनयाचा ‘देव’ मानल्या जाणाऱ्या नाना पाटेकरांना हिरावून घेणाऱ्या त्या देवालाच मारून टाकावं, असं मला वाटतंय.”

नाना पाटेकर यांच्याबद्दल

नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते आणि ते एका मराठी कुटुंबातील होते. त्यांचे वडील गजानन (दिनकर) पाटेकर हे टेक्सटाईल पेंटर आणि व्यवसायी होते, ज्यांचे निधन नाना पाटेकर २८ वर्षांचे असताना झाले होते. त्यांची आई निर्मला पाटेकर (संजनाबाई पाटेकर) गृहिणी होत्या. त्या निधनापर्यंत दिग्गज अभिनेत्यासोबत राहात होत्या. पत्नी नीलकंती पाटेकर या बँक अधिकारी, अभिनेत्री आणि थिएटर प्रोफेशनल आहेत. दोघांचे १९७८ मध्ये लग्न झाले होते आणि नंतर ते वेगळे राहू लागले, मात्र अधिकृतरीत्या घटस्फोट झाला नव्हता.

Follow Us
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’