AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : ‘तारक मेहता का…’, मालिकेत असं काय घडलं, ज्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय, ‘त्यांना कसं माहिती झालं नाना पाटेकर…’, चर्चांना उधाण

Nana Patekar : भारतीय सिनेविश्वातील दमदार अभिनेते नाना पाटेकर यांच्या नसण्याने आज भारतातील प्रत्येकाला दुःख होत आहे. पण त्यांच्या अखेरचा श्वास घेतला आणि 'तारक मेहका का उल्टा चष्मा' मालिकेत असं काही घडलं ज्यामुळे आज प्रत्येक जण एकच म्हणतोय आणि ते म्हणजे वेळ जुळून आली..., तर जाणून घ्या नेमकं काय झालं.

Nana Patekar : 'तारक मेहता का...', मालिकेत असं काय घडलं, ज्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय, 'त्यांना कसं माहिती झालं नाना पाटेकर...', चर्चांना उधाण
अभिनेते नाना पाटेकर
| Updated on: Oct 09, 2026 | 8:19 AM
Share

Nana Patekar : गेल्या 2 वर्षात अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आणि चाहत्यांना पोरकं करुन गेले. पण सर्वांचे लाडके अभिनेते नाना पाटेकर आता या जगात नाहीत हे कळल्यानंतर प्रत्येकाला मोठा धक्का बसला. आज प्रत्येकाच्या सोशल मीडिया स्टेटसवर फक्त आणि फक्त नाना पाटेकर होते. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत असं काही घडलं ज्यामुळे अनेक जण असंच म्हणत आहेत की, काही नाही फक्त वेळ जुळून आली… तर जाणून घ्या नेमकं कायं झालं.

सांगायचं झालं तर, मालिकेचे एपिसोड हे आधिच शूट झालेले असतात. मालिकेची टिम ते एपिसोड फक्त ठरलेल्या वेळेत प्रसारित करतात. अशात 8 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांना प्रश्न पडला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाघा ही भूमिका साकारणार अभिनेता तन्मय वेकारिया याने नाना पाटेकर यांचा आयकॉनीक अंदाज आठवत त्यांना श्रद्धांजली वाहिली.. ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.

जेव्हा मालिकेत नाना पाटेकर यांच्या संबंधित एपिसोड प्रसारित करण्यात आला. तेव्हा सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. चाहते देखील थक्क झाले. कारण पूर्वी शूट केलेला एपिसोड आणि नाना पाटेकर यांचं निधन… याची वेळ एकच झाली. अशात अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत मालिकेच्या टायमिंगचं कौतुक केलं.

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘त्यांना कसं माहिती झालं की नाना पाटेकर आता राहिले नाहीत?’, तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘TMKOC ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, ते वेळेच्या पुढे चालतात. ज्यांनी इतक्या लवकर श्रद्धांजली दिली आहे.’, अन्य एक नेटकर म्हणाला, ‘याला म्हणाली रियल लाईफ सीरियल, बाघाचा सीन वेगळा होता. पण स्थितीनुसार सर्वकाही बदलून दिलं… धन्यवाद असित मोदी…’

नाना पाटेकर यांचं निधन

गुरुवारी पहाटे 5.10 च्या दरम्यान नाना पाटेकर यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील घरी अंत्यसंस्कार करण्यात आले. पूर्ण पारंपरिक विधींनी नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. नाना पाटेकर यांना अखरेचा निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार आणि सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच