AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रांगड्या नानांचा सुरेल अंदाज, लेक मल्हारसोबत कारमध्ये गायलेले आशा भोसले, मोहम्मद रफी यांचे गाणे; जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

नाना पाटेकरांचा सुमारे दोन वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. कारमध्ये बसून त्यांनी असं कोणतं जुनं गाणं गुणगुणलं होतं, ज्याची आठवण आता चाहत्यांना भावूक करत आहे.

रांगड्या नानांचा सुरेल अंदाज, लेक मल्हारसोबत कारमध्ये गायलेले आशा भोसले, मोहम्मद रफी यांचे गाणे; जुना व्हिडीओ तुफान व्हायरल
Nana Patekar old videoImage Credit source: social media
| Updated on: Oct 10, 2026 | 4:21 PM
Share

अभिनयाचा सम्राट असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि साध्या राहणीमानासाठी ओळखले जायचे. पण त्यांच्या या रांगड्या स्वभावामागे एक उत्तम रसिक श्रोता दडलेला होता हे खूप कमी लोकांना माहिती होते. त्यांच्या निधनानंतर आता सोशल मीडियावर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. यातच त्यांचा कारमध्ये प्रवास करताना एक जुने गाणे गुणगुणतानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ साधारण दोन वर्षांपूर्वीचा आहे. नाना पुण्यातून कारने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा मल्हार बसला होता. याच प्रवासादरम्यान नानांनी अतिशय सहजपणे देख हमें आवाज ना देना ओ बेदर्द जमाने हे जुने हिंदी गाणे गुणगुणायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजातील तो शांत ठहराव आणि जुन्या गाण्यांबद्दलची त्यांची ओढ या व्हिडीओतून थेट मनाला भिडते.

नानांनी ज्या तन्मयतेने हे गाणे गायले ते मूळ गाणे १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमरदीप या चित्रपटातील आहे. चमका शाम का पहला तारा गगन दुलारा सबसे पहले उसने देखा प्यार हमारा असे या गाण्याचे मूळ बोल आहेत. संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले आणि गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायले होते. रुपेरी पडद्यावर हे गाणे सदाबहार अभिनेते देव आनंद आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झाले होते.

नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ त्यांच्या जुन्या हिंदी संगीतावरील अथांग प्रेमाची साक्ष देतो. त्यांच्या अचानक जाण्याने भावूक झालेल्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ आता एक अनमोल ठेवा बनला आहे. पडद्यावर आपल्या अभिनयाने आग ओकणाऱ्या नानांचे हे साधे आणि सुरेल क्षण चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी