AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाने मुलगा मल्हार पूर्णपणे खचला; रुग्णालयात पोहोचताच अश्रू अनावर, व्हिडीओ समोर

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचा मुलगा मल्हार पूर्णपणे खचला आहे. त्याचा हा व्हिडीओ समोर आला असून त्यात तो अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाने मुलगा मल्हार पूर्णपणे खचला; रुग्णालयात पोहोचताच अश्रू अनावर, व्हिडीओ समोर
नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2026 | 10:50 AM
Share

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर याचाही अश्रूंचा बांध फुटला. मल्हारचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सध्या समोर आला असून, वडिलांच्या निधनाचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मल्हार आणि कुटुंबीय पुण्यात होते. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ते वेळ न दवडता गोव्याच्या दिशेने रवाना झाले. तातडीने गोव्यात पोहोचल्यानंतर मल्हार रुग्णालयात दाखल झाला.

रुग्णालयात पोहोचताच मल्हारला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं. वडिलांच्या निधनाचा धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. काही जण त्याचं सांत्वन करताना दिसले, तर काहींनी त्याला धीर देत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मल्हार अत्यंत भावूक अवस्थेत दिसत आहे. आपल्या वडिलांना गमावल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे.

पहा व्हिडीओ-

नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार यांचं नातंही अनेकदा चर्चेत आलं आहे. मल्हारने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रात काम केलं आहे. त्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या क्षणांबाबतही अनेक माहिती समोर येत आहे. गोव्यातील घरी असताना त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मित्र आणि केअरटेकर यांनी त्यांना रुग्णालयात नेलं. रुग्णालयात नेत असतानाच CPR सुरू करण्यात आला. डॉक्टरांच्या टीमने जवळपास 45 मिनिटे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोव्यातील एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी आयुष्य आणि मृत्यूबाबत केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं होतं. “उद्या आहे, नाही… माहीत नाही,” असं म्हणत त्यांनी आयुष्याबद्दल आपले विचार व्यक्त केले होते. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे हे शब्द आणि शेवटचे व्हिडीओ अधिकच भावूक करणारे ठरत आहेत.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार