Nana Patekar: नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहते भावूक; ‘त्या गर्दीत बसलेला मी…’ म्हणत सांगितली नट होण्याची कहाणी
Nana Patekar: नाना पाटेकर हे केवळ अभिनेता नव्हते, तर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. गंभीर भूमिका असो, खलनायक असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेला स्वतःची छाप देण्याची त्यांची खास शैली होती.

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गोव्यातील एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ अवघ्या चार दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आपल्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, याबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले असून, तो त्यांचा अखेरचा व्हिडीओ असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. नाना पाटेकर यांनी या संवादात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आठवला. “त्या गर्दीत बसलेला मी… अरविंद तो मुलगा करू शकेल असं मला वाटतं,” असं सांगत त्यांनी रंगभूमीवर येण्यामागचं श्रेय सुलभाताईंना दिलं. सुलभाताईंनी आपल्याकडे बोट दाखवलं नसतं, तर कदाचित आपल्याला रंगमंचावर येण्याची संधीच मिळाली नसती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नाना यांनी आपल्या पहिल्या नाटकाची आठवणही सांगितली. राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाला पुरस्कार मिळाला होता. नाना आणि सुलभाताईंची मोठी बहीण मच्छूताई यांना या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. या पुरस्काराने त्यांच्या आयुष्याला जणू नवी दिशा मिळाली. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या मनात एक विचार पक्का झाला. अभिनय ही केवळ आवड नसून आपल्याला याच क्षेत्रात पुढे जायचं आहे, याची जाणीव त्यांना झाली. “मग तिथे कुठेतरी तुम्हाला उपरती होते, दृष्टांत होतो की मी नट आहे आता,” असं नाना या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात. त्यानंतर दुसरं काही करण्यापेक्षा अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
त्या काळात नाना नोकरी करत होते. मात्र एका बाजूला नोकरी आणि दुसऱ्या बाजूला नाटक असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर त्यांनी नोकरी सोडून रंगभूमीला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला. 1971-72 च्या आसपासचा हा काळ होता. त्यावेळी त्यांना महिन्याला 1200 रुपये पगार मिळत होता. त्या काळाच्या तुलनेत ही रक्कम मोठी होती. तरीही अभिनयासाठी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय नाना यांनी घेतला.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, दिग्दर्शक आणि रंगभूमीशी घट्ट नातं असलेले नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. आज (गुरुवार, 8 ऑक्टोबर) सकाळी गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा मल्हार पाटेकरने दिली. नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला असून चाहते आणि कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.
