AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या घरचा गणपती, स्वत: काढली फुलांची रांगोळी; राहुल देशपांडेंनी दाखवली सुंदर सजावट

Nana Patekar: नानांच्या घरचा गणपती असं कॅप्शन देत राहुल देशपांडे यांनी हे खास फोटो शेअर केले आहेत. बाप्पाच्या सुंदर सजावटीसोबतच नाना पाटेकर यांच्या घरातील हा पारंपरिक आणि साधा अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

| Updated on: Sep 21, 2026 | 8:28 AM
Share
गणेशोत्सव म्हटलं की कलाकारांच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढते. यंदाच्या गणेशोत्सवात गायक आणि संगीतकार राहुल देशपांडे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

1 / 5
या फोटोंमध्ये बाप्पाची सुंदर मूर्ती, फुलांची आकर्षक सजावट आणि घरातील साधेपणात दडलेलं खास सौंदर्य पाहायला मिळत आहे. राहुल देशपांडे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नाना पाटेकर यांच्या घरातील गणपतीची सजावट लक्ष वेधून घेते. बाप्पाच्या सभोवती झेंडूच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत सजावट करण्यात आली असून, संपूर्ण परिसराला पारंपरिक आणि प्रसन्न लूक मिळाला आहे. फुलांच्या या आरासीत बाप्पाची मूर्ती अधिकच सुंदर दिसत आहे.

2 / 5
विशेष म्हणजे, या सजावटीमध्ये कोणताही भपकेबाजपणा दिसत नाही. पारंपरिक पद्धतीने फुलांचा वापर करत अतिशय कलात्मक आणि देखणी सजावट करण्यात आली आहे. बाप्पासमोर फुलांनी आकर्षक रांगोळीही साकारण्यात आली आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या घरातील गणेशोत्सवाचा साधेपणा आणि मराठमोळा अंदाज या फोटोंमधून प्रकर्षाने जाणवतो.

3 / 5
फोटोमध्ये नाना पाटेकर स्वतः बाप्पाच्या आरासीजवळ बसून सजावटीत सहभागी झाल्याचं दिसत आहे. त्यांच्यासोबत राहुल देशपांडेही पारंपरिक कुर्त्यात दिसत आहेत. बाप्पाच्या सेवेत कलाकारही मनापासून रमलेले पाहायला मिळतात. त्यामुळे हा फोटो केवळ गणपतीच्या सजावटीचा नसून, कलाकारांच्या साध्या आणि आपुलकीच्या गणेशोत्सवाची झलक देणारा ठरला आहे.

4 / 5
नाना पाटेकर यांच्या घराच्या आतील भागातही जुन्या काळातील आठवणी जपणारी सजावट दिसते. भिंतींवर काही जुनी छायाचित्रे, लाकडी छत आणि पारंपरिक वातावरण यामुळे घराला एक वेगळाच क्लासिक लूक मिळतो. आधुनिक सजावटीपेक्षा घराच्या मूळ व्यक्तिमत्त्वाला जपणारी ही शैली चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

5 / 5
Follow Us
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष