AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: अभिनेत्याच्या पत्नीने पतीच्या निधनासाठी नानांना धरलं होतं जबाबदार अन्… नेमकं काय घडलं होतं?

Nana Patekar: नाना पाटेकर यांनी एका जवळच्या मित्रासोबत काम केले होते. पण या मित्राचे एका अपघातात निधन झाले. निधनानंतर अभिनेत्याच्या पत्नीने नाना पाटेकर यांना जबाबदार धरले होते.

Nana Patekar: अभिनेत्याच्या पत्नीने पतीच्या निधनासाठी नानांना धरलं होतं जबाबदार अन्... नेमकं काय घडलं होतं?
Nana-patekarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 2:12 PM
Share

अनेकदा सिनेमा पाहताना आपण त्यातील पात्राशी, प्रसंगांशी स्वतःला जोडून घेतो. त्या पत्रासोबत होणाऱ्या भावनिक किंवा दु:खी करणाऱ्या प्रसंगासोबत आपण देखील भावुक होतो. सर्वमसामान्य प्रेक्षकांची अशी भावना असेल तर अभिनय करणाऱ्या अभिनेत्याचा कुटुंबीयांच्या काय भावना असतील. याचा अनुभव अभिनेता नाना पाटेकर याना आपल्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळातच आला होता.

नाना पाटेकर यांनी १९७९ साली जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले यासारख्या मातब्बर कलाकार झळकले होते. या चित्रपट अजून कलाकार प्रतिभाव कलाकार होता ज्याचं नाव होत जयराम हर्डीकर. या चित्रपटात जयराम यांनी कुटुंबावर प्रेम असलेला, त्यांच्या सुखासाठी स्मग्लरच्या टोळीसाठी काम करणाऱ्या पानितकर या तरुणाचे पात्र त्यांनी साकारलं होत. या चित्रपटात नाना यांनी त्यांचा साथीदाराची भूमिका साकारली होती. चित्रपटाचा शेवटी नाना पाटेकर हे जयराम यांची हत्या करतात.

नेमकं काय झालं होतं?

मात्र, दुर्दैव असे कि १९७९ साली चित्रपट रिलीज झाल्या नंतर काही महिन्यातच जयराम हर्डीकर यांचे एका अपघातात निधन झाले. मात्र या अकस्मात निधनाचा जयराम यांच्या पत्नीला जबर धक्का बसला. त्यांनी कुठंतरी या घटनेला सिहांसन चित्रटातील त्यांच्या मृत्यूशी जोडले. त्यांनी नाना पाटेकर याना त्यांच्या मृत्याला जबाबदार ठरवले. नानांनी चित्रपटात जयराम यांचा खून केला म्हणून अपशकुन झाला असा त्यांचा समज झाल्याने त्यांनी अनेक वर्ष नाना पाटेकर यांच्याशीही बोलणे बंद केले होते. मात्र कालातंराने कित्येक वर्षानंतर त्यांची नाना यांच्यासोबत भेट झाली आणि त्यांनी तो राग विसरून नानांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. असे खुद्द नाना यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते.

जयराम हर्डीकर यांच्यासोबत काय घडलं?

‘मंतरलेली चैत्रवेल’ टीमच्या बसचा कोल्हापूरच्याच दौर्‍यावर असताना इस्लामपूरजवळ झालेल्या अपघातात जयराम हर्डिकरांचा चटका लावणारा मृत्यू झाला. असे सांगितले जाते कि अपघातानंतर बसने पेट घेतला. पेटलेल्या बसमधून जयराम सुखरूप बाहेरआले होते. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री शांताबाई जोग या बसमध्ये अडकल्याचे समजल्यावर परत त्या बसमध्ये त्यांनी धाव घेतली होती व त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही जळून गेले.

जयराम हर्डीकर मराठी रंगभूमीवरील एक मोठं नाव होत. आरोप, मंतरलेली चैत्रवेल यासारख्या नाटकांमधुन त्यांनी भुमिका साकारल्या होत्या. सिंहासन, सर्वसाक्षी, २२ जुन १८९७, सर्वसाक्षी या चित्रपटांत ते झळकले. जयराम यांची मुलगी संज्योत हर्डीकर या देखील एक उत्तम अभिनेत्री असून बेधुंद मनाची लहर’, ‘आभाळमाया’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या गाजलेल्या मालिकांसोबतच ‘सावरखेड एक गाव’ या सिनेमात अभिनय केला आहे. जयराम यांची पत्नी शांभवी हर्डीकर यांनी पतीच्या आठवणींवर ‘तुझ्याशीच बोलत्येय मी…’ २०१३ साली हे पुस्तक प्रकाशित केले.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया