AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नानांना अग्नी दिला…नेते-अभिनेते उठून गेले, पण आर्मीतला ‘तो’ मित्र …

Nana Patekar News: नाना पाटेकर आणि टेरिटोरियल आर्मीचे मेजर जनरल सुजित पाटील यांच्यातील मैत्री किती घट्ट होती हे जगाला दिसले.अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेले नेते आणि मान्यवर अंत्यविधीतील अग्निसंस्कारानंतर लगेच निघून गेले. मात्र, मेजर जनरल सुजित पाटील यांनी जे केले आता त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Nana Patekar: नानांना अग्नी दिला...नेते-अभिनेते उठून गेले, पण आर्मीतला 'तो' मित्र ...
| Updated on: Oct 14, 2026 | 8:37 AM
Share
Nana Patekar Friendship: नाना पाटेकर आणि टेरिटोरियल आर्मीचे मेजर जनरल सुजित पाटील यांच्यातील मैत्री किती घट्ट होती हे जगाला दिसले.अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेले नेते आणि मान्यवर अंत्यविधीतील अग्निसंस्कारानंतर लगेच निघून गेले. मात्र, मेजर जनरल सुजित पाटील हे बराच वेळ तिथेच बसून राहिले. मित्राला अखेरचा निरोप देण्याच्या त्या क्षणी त्यांना ती जागा सेडून जाऊच नये असे वाटल्यामुळे ते तिथेच बसून राहिले.
नाना पाटेकर आणि मेजर जनरल सुजित पाटील यांच्या मैत्रीची सुरुवात 1990 ला झाली. नाना पाटेकर यांनी ‘प्रहार’ चित्रपटात मेजर चौहान ही भूमिका साकारलेली. या भूमिकेसाठी त्यांनी कमांडो प्रशिक्षण घेतलं होतं. याच कमांडो कोर्सदरम्यान सुजित पाटील आणि नाना पाटेकर यांची भेट झाली आणि नंतर हीच भेट पुढे मैत्रीत झाली.
यंदाच्या गणपतीत नाना आणि सुजित पाटील यांची भेट झाली नव्हती. नाना स्वतः फुलं वेचून गणपती बाप्पाला अर्पण करत होते अशी आठवण मेजर यांनी बोलून दाखवली. नानांशी दोन दिवस आधीच बोलणं झाले होते. दोन दिवसांपूर्वी संवाद झालेला मित्र आज आपल्यात नाही, हे स्वीकारणं कठीण आहे असे ते म्हणाले.
नाना यांच्या अंत्यविधीला अनेक लोक आले होते. नेते, अभिनेते, शेतकरी, जवळचे मित्र असे अनेक लोक नानांच्या अंत्यविधीला आले होते. अनेक लोक अंत्यविधीपर्यंत थांबलेही आणि नंतर मात्र निघून गेले, पण तो एक मित्र शेवटपर्तंय तिथेच बसून राहिला. आपल्या जवळच्या मित्राला गमावणे हे त्याला पचतच नव्हते,
अंत्यसंस्काराच्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख सर्वांनाच असतं. नेते, मान्यवर आणि चाहत्यांसाठी नाना पाटेकर यांचं जाणं ही मोठी हानी होती. मात्र, सुजित पाटील यांच्यासाठी तो क्षण एका जुन्या मित्राला गमावण्याचा होता. अग्निसंस्कारानंतर इतर जण निघून गेले, पण सुजित पाटील तिथेच थांबले. नाना पाटेकर आणि मेजर जनरल सुजित पाटील यांची मैत्री इतकी घट्ट होती हे त्या कृतीतूनच समजते. अग्निसंस्कारानंतर उठून जाण्याऐवजी तिथेच थांबलेला तो मित्र जणू सांगत होता की…काही माणसं आपल्याला सोडून जातात, पण त्यांच्यासोबत घालवलेला काळ आपल्याला लगेच सोडून जात नाही तो कायमचाच तिथे राहतो.

Follow Us
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी