AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसीरुद्दीन शाह यांच्या मुलाचं करिश्मासोबत ब्रेकअप; अभिनेत्री म्हणाली ‘रिलेशनशिपच्या नादात..’

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा आणि अभिनेता विवान शाह सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्याने गर्लफ्रेंड करिश्माशी ब्रेकअप केलं आहे. त्यावर आता तिची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या मुलाचं करिश्मासोबत ब्रेकअप; अभिनेत्री म्हणाली 'रिलेशनशिपच्या नादात..'
Naseeruddin Shah son Vivaan ShahImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2023 | 11:33 AM
Share

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये नाती जितक्या लवकर बनतात त्या अनेकदा तितक्या लवकरही तुटताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवाह हा गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्री करिश्मा शर्माला डेट करत होता. करिश्माने म्युझिक व्हिडिओज, टेलिव्हिजन, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही काम केलंय. विवाह शाहला दोन वर्षे डेट केल्यानंतर तिने ब्रेकअप केल्याची माहिती समोर येत आहे. करिश्मा आणि विवान या दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आता या ब्रेकअपच्या चर्चांवर करिश्माची प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिश्मा म्हणाली, “होय, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मते आम्ही दोघं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होतो आणि आता मला माझ्या करिअरवर अधिक लक्ष द्यायचं आहे. विवान हा माझ्यासाठी नेहमीच कुटुंबाच्या सदस्यासारखा राहील. कधी कधी दोन लोकांमध्ये काही गोष्टी जुळून येत नाहीत.”

इतकंच नाही तर करिश्माने असंही म्हटलंय की विवानसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ती तिच्या नात्यावरच जास्त लक्ष केंद्रीत करत होती. त्यामुळे तिच्या करिअरवर जास्त परिणाम होऊ लागला होता. मात्र आता तिला करिअरकडे अधिक लक्ष द्यायचं आहे. तिने नेहमीच प्रेमाचा पाठलाग केला, मात्र आता तिला करिअरमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणूनच ब्रेकअप केल्याचं करिश्माने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आयुष्याच्या या नव्या टप्प्याचाही आनंद घेत असल्याचा तिने म्हटलंय. तर दुसरीकडे विवानने त्याच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.

करिश्माच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास तिने 2015 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटात तिने टीनाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2018 मध्ये ‘हॉटेल मिलन’, 2019 मध्ये ‘फंसते फंसाते’, ‘सुपर 30’ आणि 2022 मध्ये ‘एक विलन रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. दुसरीकडे विवान शहा याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झाल्यास 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सात खून माफ’ या चित्रपटात तो पहिल्यांदा झळकला होता. प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये ‘हॅप्पी न्यू इयर’, 2015 मध्ये ‘बॉम्बे वेलवेट’, 2017 मध्ये ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’, 2020 मध्ये ‘कबानी द कॉइन’ आणि 2023 मध्ये ‘कोर्ट; या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.