AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak : गिरिजाला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं तेव्हा…, आई झाल्यानंतर अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का, पहिल्यांदाच म्हणाली…

Girija Oak : आई होणं प्रत्येक महिलेच्या आयु्ष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण हा प्रवास सोपा नसतो. आई झाल्यानंतर मनात येणाऱ्या अनेक विचारांनी महिला त्रस्त होतात. आता गिरिजा हिने आई झाल्यानंतर नेमकं काय झालं? याबद्दल पहिल्यांदाच सांगितलं आहे...

Girija Oak : गिरिजाला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं तेव्हा..., आई झाल्यानंतर अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का, पहिल्यांदाच म्हणाली...
Girija oak
| Updated on: Jun 23, 2026 | 1:09 PM
Share

Girija Oak : अभिनेत्री गिरिजा ओक हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्रीच्या आयुष्यात एक दिवस असा देखील आलेला, जेव्हा अभिनेत्रीला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं होतं. आई झाल्यानतंर आयुष्यात झालेल्या मोठ्या बदलांबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, लग्नानंतर करियर करता येईल का? असा प्रश्न अनेक मुलींना सतावतो. तर लग्नानंतर आई झाल्यानंतर घर, काम आणि बाळ कसं सांभाळायचं… असे अनेक प्रश्न मुलींना सतावत असतात. या परिस्थितीचा सामना गिरिजा ओक हिने देखील केला आहे..

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गिरिजा हिने पोस्टपार्टम डिप्रेशनवर मोठं वक्तव्य केलं आहे. आई होण्याचा निर्णय घेतला तेव्हा करिअरचा विचार आला होता का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर गिरिजा म्हणाली, ‘मी 25 वर्षांची असताना आई झाले… म्हणून मला असं वाटलं की, आता सर्वकाही संपलं आहे. आई झाल्यानंतर सर्वात भयंकर म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन असतो आणि पोस्टपार्टम डिप्रेशन नावाचा एक खरा प्रकार असतो.. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं…. ‘

‘डिलिव्हरीनंतर हॉर्मोनल अप डाऊनमुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शतकतात.. त्या हळू – हळू बऱ्या देखील होतात. त्याबद्दल टॉक थेरपीचा आधार असणं फार गरजेचं असतं… हे सगळ तुझ्याबरोबर होत आहे…. यातून तू बाहेर पडशील… असं म्हणणारी एक व्यक्ती सोबत असणं गरजेचं असतं. ‘

‘त्या काळात मला असं वाटलं की आता सर्वकाही संपलं आहे. माझा आकार वेगळा झालेला. त्यात एक लहान मुल… त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर… सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे असं वाटलं आता एक दुकान वगैरे थाटू, तिथे क्युरेडेट वस्तू विकायला ठेवू, हँडक्राफ्ट वस्तू ठेवू…’, असं देखील गिरिजा म्हणालेली…

प्रेग्नेंसीनंतर आलेल्या ऑफरबद्दल देखील गिरिजा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला दोन नाटक ऑफक झालं… त्यानंतर मग सर्व गोष्टींची सुरुवात झाली. मी पुरस्कार जिंकले … अखेर मला वाटू लागलं की, मी करु शकते… पण आयुष्यात एक मोठा काळ तेव्हा सर्वकाही संपल्यासारखं वाटलं…’ असं देखील गिरिजा म्हणाली होती.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट