AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या रस्त्यांवर रडत बसायचा, जेवणासाठी देखील नसायचे पैसे, अनेकदा चित्रपटातून काढलं, पण आज त्याचे आहेत लाखो चाहते

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, ज्याच्याकडे कधीकाळी खाण्यासाठी देखील नव्हते पैसे, मुंबईच्या रस्त्यांवर रडत बसायचा. पण आज लाखो चाहत्यांच्या मनावर करतोय राज्य. कोण आहे हा अभिनेता?

मुंबईच्या रस्त्यांवर रडत बसायचा, जेवणासाठी देखील नसायचे पैसे, अनेकदा चित्रपटातून काढलं, पण आज त्याचे आहेत लाखो चाहते
Image Credit source: Social media
| Updated on: May 18, 2026 | 2:09 PM
Share

Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आज इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. कोणताही चित्रपट असो किंवा वेब सीरिज, नवाजुद्दीन आपल्या नैसर्गिक अभिनयाने त्या भूमिकेत प्राण ओततो.

मात्र आज ज्या उंचीवर तो पोहोचला आहे, त्या यशामागे प्रचंड संघर्ष, उपासमार, अपमान आणि अश्रूंनी भरलेला काळ दडलेला आहे. एका मुलाखतीत नवाजुद्दीनने आपल्या आयुष्यातील कठीण दिवसांची आठवण सांगताना अनेक धक्कादायक खुलासे केले. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला होता. त्यावेळी त्याच्या खिशात अवघे 2500 रुपये होते. मायानगरीत राहणे, खाणे आणि टिकून राहणे हेच मोठे आव्हान होते.

स्वत:लाच समजायचा पनौती आणि मनहूस

काम मिळत नसल्याने नवाजुद्दीनला सिक्युरिटी गार्डची नोकरी करावी लागली. अभिनयाचे शिक्षण घेतलेला कलाकार असूनही त्याला रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतल्यानंतर मुंबईत आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास खूप वाढलेला होता. आपल्याला लगेच काम मिळेल, असा त्याचा विश्वास होता. पण झालं वेगळच.

अनेक वर्षे सतत रिजेक्शन मिळाल्याने तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता. त्याला स्वतःलाच वाटू लागले होते की आपण पनौती किंवा मनहूस आहोत. कारण जेव्हा जेव्हा त्याच्या हातात एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा चित्रपट येत असे, तेव्हा शूटिंगच्या आधीच त्याला त्या चित्रपटातून बाहेर काढले जात असे.

मुंबईच्या रस्त्यांवर रडायचा

या अनुभवामुळे त्याचा आत्मविश्वास तुटत गेला. एखाद्या चित्रपटात भूमिका मिळाल्यावर तो आनंदाने मित्रांना सांगायचा पण काही दिवसांतच निर्माते त्याला कोणतीही माहिती न देता बदलून टाकायचे. वारंवार होणाऱ्या या अपमानामुळे तो आतून पूर्णपणे कोलमडून गेला होता. त्या काळात अनेकदा तो मुंबईच्या रस्त्यांवर एकटाच रडायचा. आपले दुःख कोणाला दिसू नये म्हणून तो लपून अश्रू ढाळायचा. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की अनेकदा त्याच्याकडे जेवणासाठीही पैसे नसत. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे डिनर तो फक्त पार्ले-जी बिस्किटांवर भागवत होता.

आजही जेव्हा तो पार्ले-जी खातो, तेव्हा त्याला संघर्षाचे ते दिवस आठवतात. उपासमारी, अपमान आणि संघर्ष सहन करत त्याने स्वतःला सिद्ध केले आणि अखेर आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण बॉलिवूडला आपली दखल घ्यायला भाग पाडले.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा