AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiku Weds Sheru | 49 वर्षीय नवाजुद्दीनचा 21 वर्षीय अवनीत कौरसोबत किसिंग सीन; ट्रेलर पाहून भडकले नेटकरी

टिकू वेड्स शेरू या चित्रपटातून अवनीत कौर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. अभिनेत्री कंगना रनौतचा हा चित्रपट आहे. बुधवारी ट्रेलर लाँचदरम्यान अवनीत फार भावूक झाली होती. करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचं तिने सांगितलं.

Tiku Weds Sheru | 49 वर्षीय नवाजुद्दीनचा 21 वर्षीय अवनीत कौरसोबत किसिंग सीन; ट्रेलर पाहून भडकले नेटकरी
Nawazuddin Siddiqui and Avneet KaurImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 11:29 AM

मुंबई : ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या ट्रेलरमधील किसिंग सीनवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. 49 वर्षांच्या नवाजुद्दीनला 21 वर्षीय अवनीतने किस करणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात शेरू (नवाजुद्दीन) हा स्ट्रगलिंग अभिनेता मुंबईत करिअर करण्यासाठी संघर्ष करत असतो. त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी मुलगी (टिकू) शोधतात आणि तिलासुद्धा अभिनेत्री व्हायचं असतं. भोपालमधून बाहेर पडून मुंबईतील बॉलिवूडमध्ये करिअर करता येईल यासाठी ती लग्नाला होकार देते. या दोघांचं लग्न होतं आणि त्यापुढील रंजक कथा चित्रपटात पहायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन आणि अवनीत यांचा लिप-लॉक सीन पहायला मिळतो. त्यावरून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही कलाकारांच्या वयातील अंतरावर नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. नवाजुद्दीन हा 49 वर्षांचा आहे तर अवनीत ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 21 वर्षांची झाली. ‘नवाजुद्दीनच्या चित्रपटांची निवड चुकतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा किसिंग सीन शूट करताना अवनीत 20 वर्षांची असेल, हे चुकीचं आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

It’s so disappointing to see Avneet Kaur, who is just 21, paired opposite someone who is 49. by u/EducationalLand220 in BollyBlindsNGossip

हे सुद्धा वाचा

टिकू वेड्स शेरू या चित्रपटातून अवनीत कौर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. अभिनेत्री कंगना रनौतचा हा चित्रपट आहे. बुधवारी ट्रेलर लाँचदरम्यान अवनीत फार भावूक झाली होती. करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचं तिने सांगितलं. त्याचप्रमाणे ही संधी दिल्याबद्दल तिने कंगनाचे आभार मानले.

“माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. ट्रेलर पाहतानासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्याच चित्रपटात कंगना मॅडम आणि नवाज सर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे”, असं अवनीत म्हणाली.

अभिनेत्री अवनीत कौर अवघ्या 21 व्या वर्षी सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. वयाच्या 21 व्या वर्षी अवनीतची एकूण संपत्ती जवळपास 11 कोटी रुपयांच्या घरात आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 32 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.