AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाच्या अडचणी वाढल्या; राष्ट्रीय महिला आयोगाकडून (NCW)दोघांना समन्स

रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्या अडचणी वाढत आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगाने समन रैना आणि रणवीर अलाहरणवीर अलाहबादियाबादिया यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली आहे. NCW कडून त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. दोन्ही युट्यूबर्सविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाच्या अडचणी वाढल्या; राष्ट्रीय महिला आयोगाकडून (NCW)दोघांना समन्स
| Updated on: Feb 12, 2025 | 9:29 PM
Share

रणवीर अलाहबादिया  आणि समय रैना यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीयेत. इंडियाज गॉट लेटेंट शो सध्या चांगसाच वादात सापडला आहे. समय रैनाच्या शोमध्ये, रणवीर अलाहबादियाने पालकांबद्दल केलेल्या अश्लील विनोदामुळे वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर त्यांना आणि शोला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तसेच शो बंद करण्याची मागणीही केली जात आहे. पोलिसांची कारवाई, चौकशी नंतर महाराष्ट्र सायबर सेलनंही युट्यूबला पत्र पाठवलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून रणवीर आणि समय यांना समन्स 

तसेच वेगवेगळ्या संघटनाही या युट्यूबर्सच्या निषेधार्थ आवाज उठवताना दिसत आहे. या असंवेदनशील विनोदाबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) समय रैना आणि रणवीर अलाहबादिया यांच्यासह इतर युट्यूबर्संनाही समन्स बजावलं आहे.

समय आणि रणवीरसह शोच्या इतर सदस्यांवरही कारवाई

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, एनसीडब्ल्यूने म्हटले आहे की ‘ज्या समाजात समानता आणि एकमेकांबद्दल आदराची भावना असते, तिथे अशा अश्लील वक्तव्यांमुळे जनतेचा रोष वाढतो आणि मानवतेच्या प्रतिष्ठेला आणि आदरालाही धक्का बसतो.’ अंस म्हणत आता NCW कडूनही विरोध दर्शवण्यात आला आहे. या संदर्भात, आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी समय आणि रणवीरसह शोच्या इतर सदस्यांवरही कारवाई केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 17 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता दिल्लीत होणार आहे.

रणवीरने मागितली माफी तरीही…

अश्लील विनोदावरून झालेल्या गोंधळानंतर रणवीरने सोशल मीडियाद्वारे माफी मागितली. त्याने कोणतेही कारण न देता थेट माफी मागितली आहे. तसेच, आक्षेपार्ह व्हिडिओ यूट्यूबवरून देखील काढून टाकण्यात आला आहे असं सांगितलं सांगितलं आहे. मात्र तरीही त्याच्यावरी राग शांत होताना दिसत नाहीये. सोशल मीडियावर अजूनही त्याला ट्रोल केलं जात आहे.

सेलिब्रिटींकडूनही नाराजी 

सेलिब्रिटी देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत. सुनील पाल, मनोज मुंतशीर आणि मुकेश खन्ना यांनी ही रणवीर अलाहबादिया यांच्यावर टीका केली आहे. याशिवाय, या घटनेनंतर बी प्राक म्हणजे प्रतीक बच्चनने रणवीरच्या शोमध्ये येण्यासही नकार दिला आहे. दोन्ही युट्यूबर्सना सोशल मीडियावर खूप विरोध होत आहे आणि शोवर बंदी घालण्याची मागणीही वाढत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.