
Twinkle Khanna : अभिनेत्री ट्विंकल खन्ना गेल्या काही दिवसांपासून टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँन्ड ट्विंकल’ मुळे चर्चेत आहे. हा शो ट्विंकल, काजोल हिच्यासोबत होस्ट करते. दोघींच्या शोची देखील सर्वत्र चर्चा सुरु असते. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या शोमध्ये हजेरी देखील लावली आहे… पण नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये ट्विंकल हिने असं वक्तव्य केलं ज्यामुळे अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.
‘टू मच विद काजोल एंड ट्विंकल’ ‘शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कोरियोग्राफर फराह खान आणि अनन्या पांडे आली होती. ट्विंकल म्हणाली, ‘म्हातारे अफेअर्स लवपण्यामध्ये हुशार अशतात…’ त्यानंतर रॅपिड फायर सेगमेंटमध्ये ‘आजकालची मुले कपडे बदलण्यापेक्षा लवकर जोडीदार बदलतात…’ यामध्ये ट्विंकल ग्रीन झोनमध्ये आली तर, काजोल, अनन्या, आणि फराह रेड झोनमध्ये गेले…
Biggest mistake of #AkshayKumar was marrying #TwinkleKhanna 🤦
How can she say such things on a national platform 😬#Bollywood #TwoMuchOnPrime #Kajol #AnanyaPanday pic.twitter.com/7umpGThmKU— Random Cine Mood (@RandomCineMood) November 7, 2025
तिघी रेड झोनमध्ये गेल्यानंतर ट्विंकल परिस्थिती सावरत म्हणाली, ‘ही एक चांगली गोष्ट होती… कारण आपल्या काळात आपण विचार करायचो ‘लोकं काय विचार करतील…’ यावर काजोल म्हणते, ‘मला असं वाटत नाही… आपण आजची मुलं नाही आहोत…’ पुढे स्वतःची बाजू मांडत ट्विंकल म्हणाली, ‘ते लवकर लवकर स्वतःचे जोडीदार बदलतात आणि मला असं वाटतं की, ही चांगली गोष्ट आहे…’
या वक्तव्यामुळे ट्विंकल खन्ना हिच्यावर अनेकांनी निशाणा साधला असून, अभिनेत्रीच्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे… एक नेटकरी व्हिडीओ कमेंट करत म्हणाला, ‘ट्विंकल खन्न चाळातली काकी बनत आहे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ट्विंकल खन्नासोबत लग्न करणं अक्षय कुमार याची फार मोठी चूक आहे… नॅशनल प्लॅटफॉर्मवर ती असं कसं बोलू शकते…’, सध्या सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना हिची चर्चा रंगली आहे.