AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवेदिता सराफ यांचं मालिकेत दमदार कमबॅक; ‘कृष्णाईची लेक’मध्ये जबरदस्त भूमिका

अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकाविश्वात दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 'कृष्णाईची लेक' या मालिकेतून त्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

निवेदिता सराफ यांचं मालिकेत दमदार कमबॅक; 'कृष्णाईची लेक'मध्ये जबरदस्त भूमिका
निवेदिता सराफImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2026 | 2:12 PM
Share

समाजातील रूढी, परंपरा, जुनाट विचारसरणी आणि स्त्रियांविषयी असलेल्या भेदभावपूर्ण मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या कथा नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आहेत. समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या एका आईची आणि तिच्या मुलींची ही प्रेरणादायी गोष्ट अनेकांना विचार करायला भाग पाडेल. मुलगा-मुलगी भेद, स्त्रीचा स्वाभिमान, शिक्षणाचं महत्त्व आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांसारख्या विषयांना ही मालिका प्रभावी पद्धतीने मांडणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ कृष्णाईची भूमिका साकारत असून, पुन्हा एकदा झी मराठीवर येत आहेत. त्यांच्या सशक्त अभिनयातून एका खंबीर आईचा संघर्ष आणि प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

मालिकेची कथा

ही कथा आहे कृष्णाईची, जी आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवते. मुलीच जन्माला आल्यामुळे तिच्या पतीने दुसरं लग्न केलं आणि समाजाकडून तसंच कुटुंबाकडून तिला सतत कमी लेखलं गेलं. मात्र या सर्व परिस्थितींमध्येही कृष्णाई कधीच खचत नाही. मुलगा नसल्यामुळे स्त्रीचं मूल्य कमी होत नाही, तर मुलीही मुलांइतक्याच सक्षम असतात, हा विश्वास ती आपल्या कृतीतून सिद्ध करते. कृष्णाईच्या तीन मुलींचा प्रवास या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. मोठी मुलगी शारदा शांत, संयमी आणि आईप्रमाणे समजूतदार आहे. मधली गौरी बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य तिच्यात आहे. तर सौदामिनी ही स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षी आणि करिअरकेंद्रित मुलगी आहे. प्रत्येक मुलीला समाजातील अन्याय आणि परंपरांच्या बंधनांचा सामना करावा लागतो. मात्र कृष्णाई त्यांना प्रत्येक वेळी खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देते आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करण्याचे बळ देते.

पहा मालिकेचा प्रोमो-

मुलींच्या शिक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेली धडपड ही कथानकाची महत्त्वाची बाजू आहे. कौटुंबिक दबाव, समाजाचे नियम, मुलींचं लग्न, करिअर आणि त्यांच्या आयुष्यात येणारी आव्हानं यांमधून अनेक भावनिक आणि नाट्यमय घडामोडी उलगडतात. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही केवळ कौटुंबिक नाट्य मालिका नाही, तर स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नात्यांतील भावनिक गुंतागुंत आणि सामाजिक बदल यांची प्रभावी मांडणी करणारी प्रेरणादायी कथा आहे. “मुलगी ही ओझं नसून घराचा आधार असते” हा कृष्णाईचा ठाम संदेश या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वाभिमान जपणे या मूल्यांचा वारसा कृष्णाई आपल्या मुलींना देते.

कलाकार

या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासोब ट्विंकल यादव, रोहित परशुराम, स्मिता सरवदे, संजय कुलकर्णी, साक्षी गांधी, एकता लब्दे या प्रतिभावान कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. सामाजिक विषयांना स्पर्श करणारी ही कथा लेखक तेजेश घाटगे, यांनी लिहिली असून मालिकेचं दिग्दर्शन अनिकेत साने करणार आहेत. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका येत्या 15 जूनपासून संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!.
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक...
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक....
एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतील
एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतील.
अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा
अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा.
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या...
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या....
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?.
कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार?
कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार?.