AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये चिन्मय मांडलेकर नाही तर ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, यावरून अखेर पडदा उचलण्यात आला आहे. यावेळी चिन्मय मांडलेकर नाही तर हा अभिनेता चित्रपटात महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये चिन्मय मांडलेकर नाही तर 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज
दिग्पाल लांजेकरांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 06, 2026 | 9:35 AM
Share

भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ हे सगळंच अगदी भारावून टाकणारं.. आणि अशातच भरजरी वस्त्र, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला लटकणारी भवानी तलवार यांसह घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले आणि एकच जल्लोष झाला. निमित्त होतx ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील प्रसंगाच्या सादरीकरणाचं. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील हे सहावं पुष्प आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रथमदर्शन यावेळी उपस्थितांना अनुभवता आलं. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या रूपात नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे. या चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ गीताचं दमदार सादरीकरण यावेळी करण्यात आलं. दिग्पाल लांजेकर यांनी हे गीत लिहिलं असून अवधूत गांधी, अमिता घुगरी यांचा स्वरसाज गीताला लाभला आहे. अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचं संगीत गीताला लाभलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Lokmat Filmy (@lokmatfilmy)

याआधी दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टकातील चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत होता. परंतु मुलाच्या नावावरून झालेल्या वादानंतर चिन्मयने यापुढे महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय केला होता. म्हणूनच या भागात चिन्मयऐवजी अभिजीत श्वेतचंद्र महाराजांच्या भूमिकेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचं शौर्य आणि धोरणात्मक रणनीती या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचं आहे.

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....