वृद्धेच्या सुरेल आवाजातील ‘एक प्यार का नगमा’ वायरल, 50 हजार जणांकडून शेअर

कोलकाता : पश्चिम बंगालमधील एका वृद्ध महिलेचा सुरेल आवाज सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ‘एक प्यार का नगमा है’ (Ek Pyar Ka Nagma Hai) या गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेल्या मूळ गाण्याचं आणखी एक गोड वर्जन या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते जगभरात पसरले आहेत. लता मंगेशकर यांचे […]

वृद्धेच्या सुरेल आवाजातील 'एक प्यार का नगमा' वायरल, 50 हजार जणांकडून शेअर
Follow us
| Updated on: Aug 02, 2019 | 4:15 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील एका वृद्ध महिलेचा सुरेल आवाज सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ‘एक प्यार का नगमा है’ (Ek Pyar Ka Nagma Hai) या गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेल्या मूळ गाण्याचं आणखी एक गोड वर्जन या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे.

लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते जगभरात पसरले आहेत. लता मंगेशकर यांचे स्वर्गीय स्वर ऐकत अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. 1972 साली प्रदर्शित ‘शोर’ चित्रपटात लता मंगेशकरांनी गायलेल्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याची सूरावट पुन्हा इंटरनेटवर ऐकू येत आहे. निमित्त ठरलं ते पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावरील महिलेने आळवलेले सूर.

‘बारपेटा टाऊन- द प्लेस ऑफ पीस’ (BarpetaTown The place of peace) या फेसबुक पेजवरुन दोन मिनिटं 12 सेकंदांचा हा व्हिडिओ गेल्या रविवारी पोस्ट करण्यात आला होता. अवघ्या पाच दिवसांतच या व्हिडिओने 27 लाख व्ह्यूजचा आकडा पार केला. या व्हिडिओला जवळपास 50 हजार यूझर्सनी शेअर केलं आहे. अनेकांनी कमेंट्समधून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘शोर’ चित्रपटात मनोज कुमार, नंदा आणि मास्टर सत्यजीत यांच्या भूमिका होत्या. लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेल्या ‘एक प्यार का नगमा है, मौजो की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है’ या गाण्याला आजही चाहत्यांची पसंती मिळते. संतोष आनंद यांनी लिहिलेल्या या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केलं होतं.

या पेजवरुन महिलेने गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणंही शेअर करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.