अभिनेत्याने चौघांवर केला गोळीबार, एकाने जागीच गमावले प्राण, परिसरात खळबळ

एक धक्कादायक घटना नुकताच पुढे येताना दिसत आहे. या घटनेनंतर लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. एक अभिनेत्याने चक्क चार जणांवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आलीये. या घटनेनंतर चाहते देखील चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. सर्वत्र खळबळ निर्माण झालीये.

अभिनेत्याने चौघांवर केला गोळीबार, एकाने जागीच गमावले प्राण, परिसरात खळबळ
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 3:31 PM

मुंबई : धक्कादायक माहिती टीव्ही जगतातून येत आहे. टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंह याने चक्क गोळी झाडून एक युवकाची हत्या केल्याची माहिती पुढे येतंय. या घटनेनंतर लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. अगदी छोट्या कारणावरून हा वाद सुरू होता. शेवटी हा वाद इतका जास्त टोकाला गेला की, अभिनेता भूपेंद्र सिंह याने थेट चार लोकांवर गोळीबार केला. या घटनेनंतर मोठी खळबळ ही बघायला मिळतंय. अभिनेता भूपेंद्र सिंह याला काही वेळापूर्वीच पोलिसांनी अटक देखील केल्याची माहिती पुढे येतंय.

अभिनेता भूपेंद्र सिंह याने चार लोकांवर गोळीबार केला आणि त्यापैकी एक जणाचा जीव गेला हे ऐकल्यापासून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. तसेच दोन जण गंभीर जखमी असल्याचे कळतंय. भूपेंद्र सिंह याने टीव्हीच्या अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. भूपेंद्र सिंह याची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

बढापुर येथील कुंआ गाव येथे ही धक्कादायक घटना घडलीये. भूपेंद्र सिंह याचे हे गाव आहे. झाड तोडण्यावरून तिथे भूपेंद्र सिंह याचा वाद शेजाऱ्यांसोबत झाला. शेतातील झाड तोडण्यावरून हा वाद सुरू होता. याच गावचे गुरदीप सिंह आणि भूपेंद्र सिंह यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेला. यावेळी गुरदीप सिंह, त्यांची पत्नी आणि दोन मुले उपस्थित होती.

यानंतर भूपेंद्र सिंह याने काही लोकांना बोलवले आणि गुरदीप सिंहसह त्याच्या मुलांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या भांडणामध्ये भूपेंद्र सिंह याने चक्क या गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे यामध्ये गुरदीप सिंह यांच्या मुलाचे गोळी लागल्याने थेट निधन झाले. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी या प्रकरणात भूपेंद्र सिंह याच्यासह चाैघांवर FIR दाखल केले.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण हे बघायला मिळाले. पोलिसांनी आता अभिनेता भूपेंद्र सिंह याला अटक देखील केलीये. मात्र, या प्रकारानंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. जखमींवर रूग्णालयामध्ये सध्या उपचार हे सुरू आहेत. गुरदीप सिंह यांच्या पत्नीची आणि मुलाची तब्येत अत्यंत गंभीर असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.