AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 च्या घरातून ऑरीची सुट्टी; एका दिवसात बाहेर पडला सेलिब्रिटींचा लाडका ओरहान

सेलिब्रिटी किड्ससोबत अनेकदा पार्ट्यांमध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये दिसणारा ओरहान नुकताच बिग बॉसच्या घरात पोहोचला. ओरहान ऊर्फ ऑरी हा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याचं सर्वांना वाटलं होतं. मात्र एका दिवसातच तो घराबाहेर पडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Bigg Boss 17 च्या घरातून ऑरीची सुट्टी; एका दिवसात बाहेर पडला सेलिब्रिटींचा लाडका ओरहान
ओरहान अवत्रमणीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2023 | 10:11 AM
Share

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये दर आठवड्याला काहीतरी नवीन ड्रामा पहायला मिळतो. ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खान फक्त स्पर्धकांचं मनोरंजनच करत नाही तर काहींची चांगली शाळासुद्धा घेतो. शनिवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या मंचावर एक नवीन स्पर्धक हजर होता. सतत सेलिब्रिटींसोबत दिसणारा ओरहान अवत्रमणी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सर्व सामान घेऊन तिथे पोहोचला होता. ओरहानची बिग बॉसच्या घरात जोरदार एण्ट्री झाली आणि त्याने प्रत्येकाला आपला चाहता बनवला होता. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी ऑरी घरातून बाहेर पडला. फक्त एका दिवसात त्याने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. यामागचं कारण आता समोर आलं आहे.

रविवारी ‘जस्ट चिल विथ सोहैल अँड अरबाज’चा सेशन पार पडला. यामध्ये अरबाज आणि सोहैलने स्पर्धकांचं खूप मनोरंजन केलं आणि ऑरीची मस्करीदेखील केली. मात्र या एपिसोडचा निरोप घेताना ते ऑरीलाही घराबाहेर घेऊन गेले. अरबाज आणि सोहैलने घरातील सर्व स्पर्धकांना सांगितलं की ऑरी फक्त एका दिवसासाठी शोमध्ये आला होता. ऑरी हा वाइल्ड कार्ड एण्ट्री म्हणून घरात प्रवेश करणार असल्याचं सुरुवातीला सांगितलं गेलं होतं. पण तो फक्त वीकेंडला घरातील स्पर्धकांचं मनोरंजन करण्यासाठी पोहोचला होता. हे ऐकून सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एका दिवसात ऑरी हा बिग बॉसच्या घरातील केंद्रबिंदू ठरला होता. बिग बॉसने त्याचं जोरदार स्वागत केलं होतं आणि त्याच्या एण्ट्रीनंतर घरात एक पार्टीसुद्धा करण्यात आली. ऑरी अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. बिग बॉसमध्येही तो बरंच सामान घेऊन पोहोचला आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऑरीने सांगितलंय की त्याच्याकडे 9 लाख 80 हजारांचं घड्याळ आणि दीड लाखांचे शूज आहेत.

बॉलिवूडचे स्टारकिड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, न्यासा देवगण यांच्यासोबत दरवेळी पार्ट्यांमध्ये एक चेहरा पहायला मिळतो. हा चेहरा म्हणजे ओरहान अवत्रमणी. बॉलिवूडमधल्या प्रत्येक स्टारकिड्ससोबत त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. हा ओरहान नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडलाय. या सर्व प्रश्नांची उत्तर बिग बॉसच्या घरात तरी मिळतील असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मात्र ऑरी एका दिवसातच घराबाहेर पडला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.