AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीची झाली अशी दुर्दशा; ओळखलंत का तुम्ही?

सोशल मीडियावर शीला नावाच्या एका अनाथ महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ही महिला एकेकाळी चित्रपटसृष्टीत काम करायची असा, दावा केला जात होता. परंतु आज तिची अशी अवस्था पाहून पोलिसांनी तिला अनाथाश्रमात पाठवलं. सहा महिन्यांनंतर तिचं पूर्ण आयुष्य बदललं आहे.

एकेकाळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीची झाली अशी दुर्दशा; ओळखलंत का तुम्ही?
Orphan woman sheelaImage Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2026 | 3:14 PM
Share

कलाविश्वात आणि ग्लॅमरच्या दुनियेत कधी कोणाचं आयुष्य बदलून जाईल, हे सांगता येत नाही. इथे रातोरात सर्वसामान्य माणूस स्टार बनतो आणि एका क्षणात एखाद्या स्टारचं सर्वकाही हिरावून जातं. फिल्म इंडस्ट्रीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना कामाची गरज तर आहे, पण त्यांना काम मिळत नाहीये. काही जणांचं आयुष्य इतकं बदललंय, की त्यांना आज कोणी ओळखूही शकत नाही. सध्या सोशल मीडियावर शीला नावाच्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने दावा केला की एकेकाळी ती फिल्म इंडस्ट्रीत काम करत होती. परंतु आज त्याच महिलेला लोक ‘पागल’ म्हणत आहेत.

तनुज मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक महिला भीक मागून आयुष्याचा गाडा कसाबसा ढकलत असल्याचं पहायला मिळतंय. तिच्या अंगावरील कपडे फाटलेले आहेत, तिच्या केसांची अवस्था वाईट झाली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या महिलेनं सांगितलं की, एकेकाळी ती चित्रपटांमध्ये काम करायची. संबंधित महिलेनं तिचं नाव शीला असल्याचं म्हटलंय. “माझं नाव शीला आहे आणि मी चित्रपटांमध्ये काम केलंय. मी अनाथ आहे, माझं इथे कोणीच नाही, माझ्याकडे राहायला घरही नाही. आता माझ्या मृत्यूची वेळ आली आहे”, असं ती म्हणते. अखेर पोलिसांनी तिची मदत केली असून तिला अनाथ आश्रमात पोहोचवलं. सहा महिन्यांनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.

सहा महिन्यांच्या ट्रान्सफॉर्मेशननंतर ही महिला स्वच्छ कपड्यांमध्ये आणि नीटनेटक्या अवतारात दिसत आहे. इतकंच नाही तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेनं तिच्यासोबत डान्सचा व्हिडीओ पोस्ट करत सोशल मीडियावर चर्चा घडवून आणली आहे. अनेकांनी शिल्पा शिंदेचंही कौतुक केलं आहे. ‘शिल्पा तू खरंच चांगली व्यक्ती आहेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘शिल्पाने अशा अनेकांची मदत केली आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा