माझं जगणं नरकासमान… साराच्या आईसोबत नेमकं काय बिनसलं ? अमृता सिंगसोबतच्या त्या वादावर ओरीचा धक्कादायक खुलासा
ओरीने नुकताच त्याच्या आयुष्यातील एका कठीण काळाचा खुलासा केला आहे. अभिनेत्री अमृता सिंह यांच्यामुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत झाला. सार्वजनिक आयुष्यातील टीका आणि ट्रोलिंगचा त्याच्यावर आता परिणाम होत नाही , असं तो म्हणाला.

ओरहान अवात्रामणि हा सेलिब्रिटींच्या जगात सगळीकडे ओरी (orry) नावाने फेमस आहे. तो सोशल मीडियावर तर प्रसिद्ध आहेच पण अनेक बॉलिवूड स्टार किड्सचाही तो जवळचा मित्र मानला जातो. बॉलिवूड पार्टीजमध्ये ओरी हा अनेक स्टार्ससोबत एन्जॉय करताना दिसतो. दरम्यान याच ओरीने नुकताच, त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळाबाबत खुलासा केला आहे. ज्यामुळे तुला मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची आणि अडचणींवर मात करण्याची ताकद मिळाली, असा कठीण काळ तुझ्या आयुष्यात आला होता का, असं त्याला मुलाखतीत विचारण्यात आलं. तेव्हा कोणताही आडपडदा न ठेवता ओरीने, 2021 साली त्याला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. या काळाने त्याला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवलं की, त्यानंतर सार्वजनिक आयुष्यात होणाऱ्या टीकेचा आणि ट्रोलिंगचा त्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र या कठीण अनुभवामागे सारा अली खानची (Sara Ali Khan) आई आणि अभिनेत्री अमृता सिंह (Amruta Singh) असल्याचा दावा ओरीने केला.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत ओरीने 2021 मधील एका घटनेचा उल्लेख केला. तो म्हणाला की, त्या काळात अमृता सिंह यांच्यामुळे त्याला मोठा मानसिक धक्का (trauma) बसला होता. “2021 मध्ये अमृता सिंह यांनी मला खूप त्रास दिला. तो अनुभव माझ्यासाठी खूपच मोठा होता. मी आयुष्यात यापूर्वी कधी अशा परिस्थितीतून गेलो होतो, असं मला वाटत नाही,” असं ओरीने सांगितलं.“तो माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट आणि कठीण काळ होता. त्यांनी मला खूपच वाईट परिस्थितीत आणून ठेवलं होतं” असं त्या काळाची आठवण सांगताना ओरीने पुढे म्हटलं.
या अनुभवाने ओरीला कसं बदललं?
त्या कठीण काळातून बाहेर आल्यावर, या अनुभवामुळे तू आणखी मजबूत होशीलन, असं मला माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलं, पण मला स्वतःला तसं अजिबात वाटत नव्हतं, असंही ओरी म्हणाला. “लोक मला म्हणायचे की तू या सगळ्यातून आणखी मजबूत होऊन बाहेर पडशील. पण मला असं वाटायचं की मला एवढं मजबूत का व्हायचं?’” असं ओरीने सांगितलं. मात्र त्या अनुभवाने त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम झाल्याचं कालांराने जाणवल्याच ओरीने नमूद केलं. “नंतर मला जाणवलं की आता कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. कोणतीही गोष्ट मला खरंच दुःखी करू शकत नाही,” असा अनुभव ओरीने सांगितला.
टीका आणि ट्रोलिंगचाही झाला नाही परिणाम
ओरीने सांगितलं की, या अनुभवामुळे मला लोकांच्या टीकेला सामोरं जाण्याची ताकद मिळाली. सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुरुवातीला माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि नकारात्मक कमेंट्स करण्यात आल्या. मात्र त्याचा माझ्यावर भावनिक परिणाम झाला नाही, असंही त्याने नमूद केलं.
अमृता सिंग आणि ओरीमध्ये नेमका काय मतभेद ?
ओरी आणि सारा अली कान हिची आई, आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्यात नेमका कशावरून वाद झाला, काय बिनसलं, याचा अद्याप स्पष्ट खुलासा झालेला नाही. ओरीने या अनुभवाला ‘ट्रॉमा’ म्हटलं असलं, तरी त्याब्ददल तो अजूनही काहीही स्पष्टपणे बोललेला नाहीये.
दरम्यान जानेवारी 2026 मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही ओरीने या विषयावर भाष्य केलं होतं. सारासोबत पूर्वीसारखी मैत्री असल्याचं दाखवणं म्हणजे तिच्या आईकडून जो मानसिक त्रास झाला, ते माफ केल्यासारखं होईल आणि मी आता तसं करू शकत नाही, असं ओरीने तेव्हा म्हटलं होतं.
