Bigg Boss OTT | पती आणि कुटुंबाबद्दल नकारात्मक कमेंट्स, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम नेहा भसीन म्हणते…

‘बिग बॉस ओटीटी’ची (Bigg Boss OTT) सर्वात धाडसी स्पर्धक गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) फिनालेच्या 2 दिवस आधी घराबाहेर पडली होती. प्रतीक सहजपालशी घनिष्ठ मैत्री झाल्याने तिचा पती समीर उद्दीन, आई आणि घरातील इतर सदस्यांना ट्रोल केले जात असल्याचे समजल्यावर नेहा खूपच अस्वस्थ होती.

Bigg Boss OTT | पती आणि कुटुंबाबद्दल नकारात्मक कमेंट्स, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम नेहा भसीन म्हणते...
Neha Bhasin

मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ची (Bigg Boss OTT) सर्वात धाडसी स्पर्धक गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) फिनालेच्या 2 दिवस आधी घराबाहेर पडली होती. प्रतीक सहजपालशी घनिष्ठ मैत्री झाल्याने तिचा पती समीर उद्दीन, आई आणि घरातील इतर सदस्यांना ट्रोल केले जात असल्याचे समजल्यावर नेहा खूपच अस्वस्थ होती. नेहाने आता सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने म्हटलेय की, कुटुंबाविरूद्ध नकारात्मक टिप्पण्या वाचल्यानंतर मला मरून जावे असे वाटत होते.

नेहाने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘देवा शपथ, ज्या सकाळी मी शोमधून बाहेर पडले, त्याचवेळी मी समीर, आई, बहीण आणि भावाबद्दल नकारात्मक टिप्पण्या वाचल्या. त्या टिप्पण्या वाचून मला अक्षरशः मरण्याची इच्छा होती. मला तो अंधार पुन्हा जाणवला. पण माझ्या कुटुंबाचे प्रेम, समीरचा शांत स्वभाव हा माझा आधार बनला आहे.’

‘जर तुम्हाला नकारात्मकता, ट्रोलिंग आणि नकारात्मक टिप्पण्या करणे योग्य आहे असे वाटत असेल, तर एका जुन्या गाण्यातील माझी आवडती ओळ आहे ती अशी की, ‘ऐसे जहाँ से क्यों हम दिल लगाये…’. जर खोटे बोलणारे, प्लॉटर्स जे मागे मागे बोलतात, तर ते लोक स्वीकारले जात असतील, तर मी हेच सांगू इच्छिते. माझ्यासाठी प्रेम महत्वाचे आहे आणि शेवटपर्यंत राहील.’

पाहा नेहा भसीनची पोस्ट

मिलिंद गाबाशी कनेक्शन तोडल्यानंतर प्रतीकची केली निवड

नेहा आणि प्रतीकच्या यांच्या घनिष्ठ मैत्रीमुळ नेहा आणि तिच्या कुटुंबाला ट्रोल केले जाऊ लागले. वास्तविक, शोच्या सुरुवातीला नेहा गायक मिलिंद गाबासोबत घरात गेली होती. मिलिंद आणि नेहाचे कनेक्शन बनले होते. मात्र, नंतर नेहाने मिलिंदला सोडले आणि प्रतिकशी तिचे कनेक्शन केले. त्याच वेळी, प्रतीक जो अक्षरा सिंगचा कनेक्शन होता, त्याने अभिनेत्रीची साथ सोडली आणि नेहाला कनेक्शन म्हणून निवडले.

बाहेर आल्यानंतर नेहा काय म्हणाली?

शोमधून बाहेर आल्यानंतर नेहाने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘विवाहित स्त्री असूनही मी एका पुरुषाशी मैत्रबंध निर्माण केला, याचीच मला शिक्षा मिळते आहे. मात्र, आम्ही एकमेकांना कसा पाठिंबा दिला आणि एकमेकांच्या बाजूने कसे उभे राहिलो, हे कोणी पाहिले नाही. आम्ही आमची मैत्री कधीच एकमेकांना ओलांडू दिली नाही. आम्ही वेळोवेळी एकमेकांचे अश्रू पुसले. आम्ही कुठे चुकलो हेच मला समजत नाही. हे माझ्यासाठी खूप क्लेशदायक आहे आणि या सगळ्यानंतर मला समजले की, मला शिक्षा झाली कारण एक विवाहित स्त्री असूनही मी इतर पुरुषाशी मैत्रीचा बंध निर्माण केला.’ बिग बॉसच्या घरात नेहा आणि प्रतीक यांच्या बॉण्डसंदर्भात बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, परंतु या दोघांनीही त्यांच्या मैत्रीवर कधीही याचा परिणाम होऊ दिला नाही.

हेही वाचा :

Raj Kundra | हातात प्लास्टिकची पिशवी अन् डोळ्यात अश्रू, दोन महिन्यांनी तुरुंगाबाहेर येताना ‘अशी’ होती राज कुंद्राची अवस्था!

‘भरत जाधवने आज रडवलं यार…’, चाहत्याकडून मिळालेलं कौतुक शेअर करत भरत जाधव म्हणतात…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI