Bigg Boss OTT : बिग बॉस ओटीटी होस्ट करण जोहरवर चिडली माजी स्पर्धक सोफिया हयात, म्हणाली-फक्त नातेसंबंध आणि हिंसाचाराला देतो प्रोत्साहन

सोफियाने करणवर आरोप केला आहे की, करण जोहर सलमान खानपेक्षा वाईट होस्ट आहे. जिथे तो सध्या या शोमध्ये हिंसा आणि नेपोटिझमला प्रोत्साहन देत आहे. सोफियाने म्हटले आहे की जर हा शो यूके मध्ये चालला असता तर तो आतापर्यंत बंद झाला असता.

Bigg Boss OTT : बिग बॉस ओटीटी होस्ट करण जोहरवर चिडली माजी स्पर्धक सोफिया हयात, म्हणाली-फक्त नातेसंबंध आणि हिंसाचाराला देतो प्रोत्साहन
बिग बॉस ओटीटी होस्ट करण जोहरवर चिडली माजी स्पर्धक सोफिया हयात

मुंबई : बिग बॉस ओटीटी आजकाल सतत चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या हे खूप पसंतीस पडत आहे. अशा परिस्थितीत, बिग बॉस सीझन 7 चा हिस्सा असलेल्या अभिनेत्री सोफिया हयातने या बिग बॉस ओटीटीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. जी जाणून घेतल्यावर असे वाटते की अभिनेत्री हा शो बाबत फार आनंदी नाही, यामुळे तिने या शो प्रति आपला राग व्यक्त केला आहे. सोफियाने बिग बॉस ओटीटी होस्ट करण जोहरला सलमान खानपेक्षा वाईट होस्ट म्हटले आहे. करण जोहरच्या शोच्या होस्टिंगबाबत सोफिया व्यतिरिक्त अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जिथे लोकांनी सांगितले आहे की करण फक्त काही लोकांना शो मध्ये पुढे जाण्याची आणि बोलण्याची संधी देतो. (Bigg Boss OTT host Karan Johar is angry with former contestant Sophia Hayat)

सोफियाने करणवर आरोप केला आहे की, “करण जोहर सलमान खानपेक्षा वाईट होस्ट आहे. जिथे तो सध्या या शोमध्ये हिंसा आणि नेपोटिझमला प्रोत्साहन देत आहे. सोफियाने म्हटले आहे की जर हा शो यूके मध्ये चालला असता तर तो आतापर्यंत बंद झाला असता. एवढेच नव्हे तर हे सर्व केवळ टीआरपीसाठी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. हे सर्व बिग बॉसची जुनी शैली आहे. जे आता परत स्वीकारले जात आहे.”

बिग बॉस ओटीटी मुलांच्या मनावर परिणाम करेल

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिनेत्री पुढे म्हणते की “भारत अध्यात्माची भूमी आहे, जिथे धर्म कोणाचेही नुकसान करत नाही, करण आणि हा शो बिग बॉस ओटीटी पूर्णपणे धर्माच्या विरोधात जात आहेत. ज्यामुळे आपली देवभूमी आता अपमानित होत आहे. या शोमध्ये अश्लीलता आणि हिंसाचारालाही प्रोत्साहन दिले जात आहे आणि शोचा होस्ट त्यांच्या मजबुरीवर हसत आहे. हेच कारण आहे की मी या शोमध्ये परत कधीही जाणार नाही. मुलांबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटले आहे की या शोचा मुलांवर किती परिणाम होईल आणि प्रत्येकाने त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामाचाही विचार केला पाहिजे. याआधी सोफियाने सोशल मीडियावरील एका खास पोस्टमध्ये म्हटले होते की, ती सलमान खानसोबत बिग बॉस 14 च्या फिनालेचा स्टेज शेअर करू इच्छित नाही. तिने अभिनेत्याला विविध प्रश्न विचारले आणि तिने लिहिले की ती कधीही सलमान खानसोबत कोणताही स्टेज शेअर करणार नाही. (Bigg Boss OTT host Karan Johar is angry with former contestant Sophia Hayat)

इतर बातम्या

डीजीसीएने अडीच वर्षांनंतर हटवली बोईंग 737 मॅक्स विमानांवरील बंदी, या भारतीय विमान कंपनीला होईल थेट फायदा

VIDEO : ’21 वर्ष काम करुन वेतन नाही’, प्राध्यापकाच्या पत्नीचं पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर श्राद्ध घालत आंदोलन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI