AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gehraiyaan Movie : दीपिका पादुकोणचं ओटीटी डेब्यू, ‘गेहराईयाँ’ रिलीज होताच प्रेक्षकांचा भरूभरून प्रतिसाद

बहुप्रतिक्षित 'गेहराईयाँ' सिनेमा आज अॅमेझॉन प्राईम ओटीटीवर प्रदर्शित झालाय. याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय.

Gehraiyaan Movie : दीपिका पादुकोणचं ओटीटी डेब्यू, 'गेहराईयाँ' रिलीज होताच प्रेक्षकांचा भरूभरून प्रतिसाद
‘गेहराईयाँ’
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 12:16 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : बहुप्रतिक्षित ‘गेहराईयाँ(Gehraiyaan Movie) सिनेमा आज अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) ओटीटीवर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सिनेरसिकांना हा सिनेमा भावतोय. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (deepika padukon) ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा, नसिरुद्दीन शाह, रजत कपूर हे सगळे कलाकार आपल्याला एकत्र स्क्रिनवर पहायला मिळतात. दीपिकाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा तिच्या चाहत्यांच्या मनात घर करतोय. शकुन बत्रा (Shakun Batra) यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नात्यांची गुंतागुंत दाखवतो… आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चित्रपटाची कथा जरी मुंबईत घडत असली तरी या कथेचा नाशिकशीही संबंध आहे… तो काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

गेहराईयाँची कथा

गेहराईयाँ हा चित्रपट आज अॅमेझॉनवर प्रदर्शित झालाय. मुंबई राहणारी अलिशा आणि तिची परदेशातून आलेली बहिण टिया यांचं नातं, या दोन बहिणींच्या घरातील नातेसंबंध, दोघींचं ‘लव्ह लाईफ’ यांच्या भोवती ही कथा फिरते. या सिनेमाच्या कथेत अनेक नात्यांची गुंतागुंत आहे. या कथेतील प्रत्येक पात्राची स्वत: ची एक गोष्ट आहे. हळूहळू एक एक पात्र आणि त्याची गोष्ट समोर येते. दीपिकाच्या बोल्ड अभिनयाबद्दल, तिच्या पात्राबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचं बऱ्यापैकी शूटिंग हे एका क्रुझवर झालंय. कथेचा हॅप्पी एंडिग नसला तरी तो चित्रपटाच्या नावाला साजेसा आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं या चित्रपटाविषयीचं मत मांडलं आहे. अनेकांनी हा सिनेमा आवडल्याचं म्हटलंय. काहींना दीपिकाचं पात्र आवडलंय तर काहींनी सिनेमाची गोष्ट रंजक असल्याचं म्हटलंय.

मुव्ही रिव्ह्यू

गेहराईयाँ चित्रपटाची मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. हा सिनेमा आज अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालाय. तुम्हाला जर चांगली कथा आणि दमदार अभिनय पहायचा असेल तर हा सिनेमा तुम्ही बघायलाच हवा. ही सिनेमा आहे दोघी बहिणी आणि त्यांच्या भोवतीच्या नात्यांच्या गुंतागुंतीची. दीपिका पादुकोण अलिशा नावाचं पात्र साकारतेय. तर अनन्या पांडे तिच्या बहिणीचं टियाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची गोष्ट दमदार आहे. नसिरुद्दीन शाह, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा, रजत कपूर यासारखे तगडे कलाकार तुम्हाला एकाच स्क्रीनवर पहायला मिळतात. एकदम पैसा वसून सिनेमा आहे. तुम्ही या चित्रपटातील कलाकारांच्या प्रेमात असाल तर तुम्ही हा सिनेमा बघितलाच पाहिजे शिवाय जर तुम्ही निसर्गाच्या प्रेमात असाल तर तुम्ही हा सिनेमा आवर्जून बघितला पाहिजे. सुर्यास्त, समुद्र यांचा अतभूत नजारा तुम्हाला बघायला मिळेल.

संबंधित बातम्या

‘द फेम गेम’ ‘मधून माधुरीचं डिजिटल जगात पदार्पण, धमाकेदार ट्रेलर रिलीज, झगमगाटी विश्वामागचं गडद सत्य

ढोलकीचा आवाजाने घायाळ करणारा चंद्रमुखी चित्रपट लवकरचं तुमच्या भेटीला, अजय अतुलचं दमदार संगीत

Sherlyn Chopra Birthday : शर्लिन चोप्राचा दब्बू लडकी ते playboy मॅगझिनपर्यंतचा प्रवास, वाचा खास स्टोरी…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.