Samay Raina : समय रैना याच्या शोमध्ये ‘कुत्र्याचं मांस’ खाण्यावरुन वादग्रस्त विधान, गुन्हा दाखल
कॉमेडी शोमध्ये वादग्रस्त विधानं हे काही नवीन राहिलेलं नाही. मात्र या वादग्रस्त विधानांमुळे आतापर्यंत अनेक विनोदवीरांना अडचणींना सामना करावा लागला आहे, असंच काहीसं एका स्पर्धकाविरुद्ध झालं आहे. जाणून घ्या.

स्टँडअप कॉमेडीयन, कॉमेडी शो या आणि अशा अनेक कार्यक्रमांमधून विविध विषयावंर विनोदी अंगाने भाष्य केलं जातं. मात्र कधी-कधी या कॉमेडीयनकडून करण्यात आलेल्या एखाद्या जोकवरुन किंवा वाक्यावरुन वादाला तोंड फुटतं. त्यामुळे एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या जातात. मात्र आता एक असा प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये कॉमेडियन नाही, तर एक महिला स्पर्धेक अडचणीत सापडली आहे. नक्की काय झालंय? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
समय रैना याची आघाडीच्या विनोदवीरांमध्ये गणना केली जाते. समय रैना याचा सोशल मीडियावर स्वतंत्र फॅनहेस आहे. समयने आतापर्यंत चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. मात्र समयच्या कार्यक्रमात सहभागी झालेली महिला स्पर्धकाची अडचण वाढली आहे.
समय रैना हा त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कॉमेडी शो साठी लोकप्रिय आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो यूट्यूबवर प्रसारित होतो. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ चा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेशमधील जेसी नबाम नावाची एक महिला स्पर्धक सहभागी झाली. जेसीने परफॉर्म करताना तिच्या राज्याबाबत चुकीचं विधान केलं, ज्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने जेसी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
नक्की काय झालं?
तु कधी कुत्र्याचं मांस खाललंय का? असा प्रश्न समय रैना याने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात जेसीला केला. यावर जेसीने मी कधी खाल्लं नाही, मात्र अरुणाचल प्रदेशमधील लोकं कुत्र्यांचं मांस खातात, असं म्हटलं. मला याबाबत माहितीय कारण माझे मित्र हे मांस खातात. ते (मित्रांना उद्देशून) कधीकधी पाळीव प्राण्यांनाही खातात, असं जेसीने म्हटलं. हे तु बोलायचं म्हणून बोललीस, असं परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या बलराज सिंह घई यांनी जेसीला म्हटलं.
जेसी काय म्हणाली?
त्यानतंर जेसीने बलराज यांना मी खरं सांगितलं असं म्हटलं. यानंतर अरुणाचल प्रदेशमधील अरमान राम वेली बखा यांनी जेसीविरोधात 31 जानेवारीला गुन्हा दाखल केला. जेसीने अरुणाचल प्रदेशमधील जनतेचा अपमान केल्याचा आरोप अरमान राम वेली बखा यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत समय रैना याच्या टीमकडून कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.