‘मिर्झापूर 3’वर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार, वाचा कोर्टात काय घडलं?

मिर्झापूर सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. सीरिजला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेमही मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक मिर्झापूर सीजन 3 ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

'मिर्झापूर 3'वर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार, वाचा कोर्टात काय घडलं?
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 2:28 PM

मुंबई : मिर्झापूर (Mirzapur) वेब सीरिज सुरूवातीपासूनच वादात सापडली होती. आता या वेब सीरिजचे तिसरे सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. मात्र, तिसरे सीजनही वादात अडकले असून हा वाद थेट न्यायालयात (Court) देखील गेला. मिर्झापूर सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. सीरिजला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेमही मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक मिर्झापूर सीजन 3 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. परंतू मिर्झापूर सीजन 3 (Season 3) वर बंदी घालण्याची एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिलाय.

मिर्झापूर वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेले दृश्य आणि भाषा यामुळे सीरिजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने मिर्झापूर वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी मान्य केली नाहीये. मिर्झापूर येथील रहिवासी सुजित कुमार सिंह यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. वेब सीरिजचे प्री-स्क्रीनिंग करणे देखील शक्य नसल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट सांगितंय.

मिर्झापूर वेब सीरिज आणि वाद हे समीकरण सुरूवातीपासूनच आहे. मात्र, प्रेक्षकांना मिर्झापूर वेब सीरिज सुरूवातीपासूनच आवडलीये. न्यायालयाने फक्त वेब सीरिजच्या पक्षामध्ये निकाल दिला नाही तर याचिकाकर्त्याला आपली तक्रार मागे घेण्याचे देखील आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निकालानंतर हे तर स्पष्ट झाले आहे की, मिर्झापूर सीरिज आता रिलीज होऊ शकते. मिर्झापूरच्या तिसऱ्या भागामध्ये काय खास असणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.