International Emmy Awards 2021 : सुष्मिता सेनची ‘आर्या’ बेस्ट ड्रामा सीरीजसाठी नॉमिनेट, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आनंद!

सुष्मिता सेन (Sushmita Sen)  बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी, सुष्मिता 10 वर्षांनी अभिनय क्षेत्रात परतली आहे. ती क्राईम सीरीज ‘आर्या’द्वारे (Aarya) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

International Emmy Awards 2021 : सुष्मिता सेनची 'आर्या' बेस्ट ड्रामा सीरीजसाठी नॉमिनेट, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आनंद!
Sushmita Sen

मुंबई : सुष्मिता सेन (Sushmita Sen)  बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी, सुष्मिता 10 वर्षांनी अभिनय क्षेत्रात परतली आहे. ती क्राईम सीरीज ‘आर्या’द्वारे (Aarya) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जेव्हा बरेच कलाकार बऱ्याच काळानंतर चित्रपट आणि शोमध्ये परततात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळत नाही, पण सुष्मिताने ‘आर्या’मधील तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

सुष्मिताने या सीरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. अभिनेत्रीचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनी देखील खूप कौतुक केले. गेल्या वर्षी सुष्मिताने या मालिकेसाठी अनेक पुरस्कार पटकावले होते आणि तरीही मालिका आणि सुष्मिताची जादू कायम आहे. वास्तविक, आर्याला आणखी एक मोठी कौतुकाची थाप मिळाली आहे. या सीरीजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021मध्ये (International Emmy Awards 2021) नामांकन मिळाले आहे.

वास्तविक, भारतामधून केवळ ‘आर्या’ला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय ड्राम सीरीजमध्ये नामांकित करण्यात आले आहे. खुद्द सुष्मिता सेनने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करताना सुश्मिताने लिहिले, ‘भारत… टीम आर्याचे अभिनंदन.’ यासोबतच सुश्मिताने नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि वीर दास (Vir Das) यांना देखील नॉमिनेशनसाठी अभिनंदन केले आहे.

पाहा सुष्मिताची पोस्ट :

वास्तविक, नवाजुद्दीनचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि वीर दासची विनोदी मालिका ‘वीर दास: फॉर इंडिया’ हिला विनोदी विभागासाठी नामांकन देण्यात आले आहे.

आर्याची स्टारकास्ट

आर्या बद्दल तुम्हाला सांगू की, या मालिकेत सुष्मिता सोबत चंद्रचूर सिंग (Chandrachur Singh), सिकंदर खेर (Sikandar Kher), विकास कुमार (Vikas Kumar) आणि इतर अनेक कलाकार सामील आहेत. यामध्ये सुष्मिता आर्याची भूमिका साकारत आहे, ज्यात ती तिच्या पतीच्या मृत्यूनंतर वेगळ्या अवतारात दिसते. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ती कोणाशीही लढायला तयार आहे.

‘आर्या 2’चे शूटिंग झाले पूर्ण!

ऑगस्टमध्येच सुष्मिताने आर्याच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. सुष्मिताने चित्रपटाच्या टीमसोबत एक फोटो शेअर केला आणि लिहिले, एक मोठे कुटुंब ज्यांच्यावर मी खूप प्रेम करतो. या मालिकेचे दिग्दर्शक राम माधवानी (Ram Madhvani) असून, त्यांनी ‘आर्या 2’चे चित्रीकरण पूर्ण सुरक्षिततेने पूर्ण केले. ‘आर्या 2’ची रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे तोपर्यंत चाहत्यांना वाट पाहावी लागेल. ‘आर्या’ ही सीरीज ‘पेनोझा’ या क्राईम ड्रामाचे भारतीय रुपांतरण आहे.

हेही वाचा :

Bigg Boss 15 : मध्य प्रदेशच्या जंगलात पार पडला ‘बिग बॉस 15’ चा लॉन्चिंग इव्हेंट, पाहा खास फोटो

Kota Factory Season 2 | अवघ्या काही तासांत ‘कोटा फॅक्टरी 2’ रिलीज होणार, जाणून घ्या केव्हा आणि कुठे पाहू शकता हा शो…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI