AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Upp: वयाच्या ६व्या वर्षी मुनव्वर फारुकीसोबत घडलं असं काही, जे ऐकून स्पर्धकांना झाले अश्रू अनावर

अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) या शोचा एक नियम आहे, या शोमध्ये टिकून राहायचं असेल, तर स्पर्धकाला तुमच्या मनात दडलेलं रहस्य सर्वांसमोर सांगावं लागतं.

Lock Upp: वयाच्या ६व्या वर्षी मुनव्वर फारुकीसोबत घडलं असं काही, जे ऐकून स्पर्धकांना झाले अश्रू अनावर
Munawar FaruquiImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 2:17 PM
Share

अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोचा एक नियम आहे, या शोमध्ये टिकून राहायचं असेल, तर स्पर्धकाला तुमच्या मनात दडलेलं रहस्य सर्वांसमोर सांगावं लागतं. 27 फेब्रुवारीपासून हा रिअॅलिटी शो सुरू झाला असून आता जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांत शोमधील अनेक स्पर्धकांनी गुपितं सांगून स्वतःचं स्पर्धेत सुरक्षित केलं. कधी मंदाना करीमीने चित्रपट निर्मात्यासोबतचं तिचं नातं उघड केलं तर कधी अंजली अरोरा आणि अजमा फल्लाह यांनी पैशांसाठी काय केलं याबद्दलचा खुलासा केला. आता पुन्हा एकदा मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. जे ऐकून कंगनासह शोमधील सर्व स्पर्धक भावूक झाले.

शोमध्ये आरोपपत्रात मुनावर फारुकीचं नाव अनेकदा आलं. लॉक अपमधून बाहेर पडण्यासाठी त्याला अनेकदा नॉमिनेट करण्यात आलं. मुनव्वरने याआधीही स्वत:ला वाचवण्यासाठी त्याच्या खासगी आयुष्यातील गुपित सांगितलं होतं. “माझ्या आईने अॅसिड पिऊन आत्महत्या केली होती. आम्हाला तिचा जीव वाचवता आला नाही. माझे आई-वडील नेहमीच भांडत असत. माझी आई तिच्या आयुष्यात कधीच आनंदी नव्हती”, असं त्याने आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं.

पहा मालिकेचा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

मुनव्वर पुन्हा एकदा झाला व्यक्त

“मी ही गोष्ट कधीच कोणासोबत शेअर केली नाही. मी 6 वर्षांचा होतो तेव्हा ही घटना घडली होती. माझ्या कुटुंबातील जी जवळची व्यक्ती होती आणि ते कधी कधी… माझ्यासोबत काय घडतंय हे मला त्यावेळी समजलं नव्हतं. 4-5 वर्षे असंच चालू राहिलं. चौथ्या वर्षी जेव्हा त्या घटनेने आपली मर्यादा ओलांडली, तेव्हा…”, असं सांगत असतानाच मुनव्वरला रडू कोसळतं. हे ऐकून सायेशालाही अश्रू अनावर होतात.

लहानपणी मुनावर याच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी तो शोमध्ये व्यक्त झाला. त्याने सांगितलेली घटना ऐकून कंगनासुद्धा अस्वस्थ झाली. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा:

KGF 2: थांबायचं न्हाय आता थांबायचं न्हाय! 11 दिवसांत ‘केजीएफ 2’च्या कमाईचा थक्क करणारा आकडा

जिच्यासाठी विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात केला राडा; तीच घेणार घटस्फोट?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.