Ranveer Allahbadia: रणवीर अलाहाबादिया याचे वडिल काय काम करतात? ‘मिरॅकल मॅन’ या नावाने का ओळखले जातात?
गेल्या काही दिवसांपासून पालकांच्या विरोधातील वादग्रस्त कमेंट्समुळे प्रचंड वादग्रस्त ठरलेला युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्या पालकांचा ही उद्धार केला जात आहे. स्टँडअप कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये रणवीर याने पालकांबद्दल अश्लाघ्य वक्तव्य केले होते. त्यानंतर अनेक राज्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या देशभरात वादग्रस्त ठरला आहे. त्याने समर रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये पालकांच्या बद्दल अश्लाघ्य वक्तव्य केल्याने या शोच्या सर्व कलाकारांचे वांदे झाले आहेत. आणि या ब्लॅक कॉमेडी प्रकारच्या शोला आता आवरतं घ्यावे लागले आहे. कारण या शोचा निर्माता समर रैना याने या शोचे आतापर्यंत सगळेच व्हिडीओ डिलिट करुन टाकले आहेत. आता तर या शोविरोधात आणि रणवीर अलाहाबादिया याच्या विरोधात सोशल मीडियावर हंगामा सुरु झाला आहे. तर या प्रकरणात खार पोलिसांनी सर्व कलाकारांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. यात रणवीर याने नुकतीच एक भावूक पोस्ट केली आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून आपण तपासाला सहकार्य करणार असल्याचे त्याने मान्य केले आहे. युट्युबरची रणवीर याचे पालक कोण आहेत, याविषयावर चर्चा सुरु आहे.
रणवीर अलाहाबादिया याचे वडील उद्योजक असून ते आयव्हीएफ लॅब चालवतात. . गौतम अलाहाबादिया यांना मिरॅकल मॅन म्हणून ओळखले जाते. काय करतात ते वाचूयात…रणवीर अलाहाबादिया याची आई स्वाती आणि वडील गौतम हे देशभरात चर्चेत आले आहेत. रणवीर याचे वडील गौतम अलाहाबादिया हे एक IVF तज्ञ्ज आहेत. रणवीरचे वडीलांची संपूर्ण फॅमिली वैद्यकीय व्यवसायात आहे. त्यांच्या वेबसाइट दिलेल्या माहितीनूसार, त्यांना ‘मिरॅकल मॅन’म्हटले जाते . भारतातील पहिली ट्रान्स-एथनिक सरोगसी आणि लेस्बियन जोडप्यासाठी पहिली गर्भधारणा करण्यासाठी देखील ते ओळखले जातात. गौतम अलाहाबादिया आज जरी यशस्वी IVF तज्ञ्ज डॉक्टर असले तरी त्यांना एक कलाकार व्हायचे होते. त्यांच्या इमारतीच्या गॅरेजमध्ये त्यांनी त्यांचे आयव्हीएफ ( कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान ) क्लीनिक आणि लॅब सुरु केली होती.
या लॅबोरेटीरत ते SIMM प्रोसेसिंग करायचे.त्यानंतर त्यांनी ‘रोटुंडा’ नावाचे आयव्हीएफ सेंटर सुरू केले. या तंत्रज्ञानवर त्यांनी अनेक माहितीपर पुस्तके आणि शोधनिबंधही लिहिले आहेत. यासाठी अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत.
स्पर्म बँकच्या विरोधात होते गौतम यांचे पालक
साल १९९६ मध्ये स्पर्म बँक उघडली तेव्हा हे तंत्रज्ञान फारसे कोणाला माहिती नव्हते, अशा प्रकारची वीर्य साठवणूक करण्याची बँक असते याची निदान भारतात तरी कोणालाच माहीती नव्हती. तेव्हा या प्रकाराला त्यांच्या पालकांनी विरोध केला. त्यांची लोक टींगल टवाळी करायचे. लोकांची स्पर्म गोळा करायचे हा धंदा झाला का अशी टीका त्यांच्यावर होत असायची. त्यांना कर्ज कसे काढावे हे कळत नव्हते.नंतर वातावरण बदलले. रणवीर यांच्या वडिलांच्या मते भारतीय कायद्यांर्गत स्थापन झालेले रोटुंडा हे एकमेव LGBT (लेस्बियन गे बाय-सेक्सुअल ट्रांस-सेक्सुअल) फ्रेंडली क्लीनिक आहे. रणवीर यांची आई एक स्री रोग तज्ज्ञ आहेत. तसेच गौतम आणि स्वाती या रोटुंडा क्लीनिकच्या सह-संस्थापक देखील आहेत.
