AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर अलाहाबादीया दिलगिरी व्यक्त करताना म्हणाला, ‘माझ्या आईच्या क्लीनिकमध्ये पेशंट बनून…’

'इंडियाज गॉट लेटेंट'शोमध्ये युट्युबर रणवीर अलाहाबादिया पालकांच्या लैंगिक जीवनावर भाष केल्याने मोठा वाद सुरू आहे. त्यावरुन या शोचे सर्व कलाकार कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. रणवीर अलाहाबादिया याने माफी मागितली आहे. दरम्यान समय रैना याने 'इंडियाज गॉट लेटेंट'चे सर्व एपिसोड डिलीट केले आहेत.

रणवीर अलाहाबादीया दिलगिरी व्यक्त करताना म्हणाला, 'माझ्या आईच्या क्लीनिकमध्ये पेशंट बनून...'
| Updated on: Feb 15, 2025 | 10:01 PM
Share

कॉमेडियन समय रैना याच्या शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ देशात सध्या वादग्रस्त ठरला आहे. ब्लॅक कॉमेडी शोमध्ये आपल्या पालकांच्या लैगिंक जीवनाविषयी जोक करुन वादात सापडलेला युट्युबर रणवीर अलाहाबादीय़ा याच्या अडचणीत वाढच होत चालली आहे. रणवीर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून देशभरात गुन्हे दाखल होत आहेत. संसदेत या प्रकरणात चर्चा घडली.सामान्य नागरिक आणि राजकारणी, सेलिब्रिटीपासून ते हिंदू संस्कृतीरक्षक संघटनांनी अक्षरश: रणवीरवर टीकेचा भडिमार सुरु केला आहे. याप्रकरणात सर्वात आधी आसामच्या मुख्यमंत्र्‍यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आता तर अनेक राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

कॉमेडियन समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणात रणवीर अलाहाबादिया वर केसेस दाखल झाल्या असताना तो समन्स देऊनही हजर झालेला नाही. रणवीर यांचे सहकारी समय रैना, युट्युबर आशीष चंचलानी आणि इंफ्लुएंसर अपूर्वा मखीजा सह सर्व टीमवर केस दाखल झाली आहे. सर्वांना आळीपाळीने मुंबईतील खार पोलिस स्थानकात बोलावून चौकशी सुरु झाली आहे. अद्यापर्यंत रणवीर अलाहाबादिया याचा जबाब घेतलेला नसून त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. रणवीर याच्या मुंबईतील घराला टाळा लागला आहे. तर अलाहाबादिया याचा फोन स्विच ऑफ लागत आहे. एवढच काय तर त्याच्या वकीलाशी देखील बोलणे झालेले नसल्याचे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रणवीर अलाहाबादिया याची पोस्ट

रणवीर भारतात नसल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. यात आता युट्युबर रणवीर अलाहाबादिया याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. इंस्टाग्रामवर त्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की माझी टीम आणि मी पोलिस आणि अन्य तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. मी सर्व कायदेशीर प्रक्रीयेचे पालन करणार आहे. सर्व एजन्सींना मी सामोरे जाण्यास तयार आहे. पालकांच्या संदर्भातील माझे वक्तव्य असंवेदनशील आणि अनादर करणारे होते. चांगलं वागणं माझी नैतिक जबाबदारी आहे. मला खरोखरच दु:ख आणि पश्चाताप आहे.

मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी घाबरलो आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला आणि कुटुंबाला धमकावले जात आहे. लोक पेशंट बनण्याचा बहाणा करुन माझ्या आईच्या क्लीनिकमध्ये घुसले होते. मला भीती वाटते आणि मला कळत नाही काय करावे. परंतू तरीही मी पळणारा नाही. माझा पोलिस आणि भारतीय न्याय प्रणालीवर विश्वास आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.