महाराष्ट्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेट मॅच,’एमबीसीसीएल’च्या लोगोचे अनावरण

शेलार मामा फाऊंडेशन' आणि 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेट मॅच,'एमबीसीसीएल'च्या लोगोचे अनावरण
'एमबीसीसीएल'च्या लोगोचे अनावरणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:51 AM

मुंबई : क्रिकेट (Cricket) म्हणजे आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मग त्यापासून आपले कलाकारही कसे दूर राहणार? अनेक जण क्रिकेटचे शौकीन आहेत. मात्र चित्रीकरणाअभावी, वेळेअभावी त्यांना आपली ही आवड जोपासता येत नाही. हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) यांने मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) स्थापना केली आहे. ‘शेलार मामा फाऊंडेशन’ (Shelar Mama Foundation) आणि ‘प्लॅनेट मराठी’ (Planet Marathi) प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या जबरदस्त लोगोमध्ये महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या पिळदार मिश्या, फेटा, बॅट, बॉल आणि स्टंप दिसत आहेत. मराठीबाणा जपणारा हा लोगो समोर आल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे ती एमबीसीसीएलची. त्यामुळे आता एमबीसीसीएलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एमबीसीसीएलबद्दल सुशांत शेलार म्हणतो “प्लॅनेट मराठीसोबत हा उपक्रम राबवताना खूप आनंद होत आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. आता लोगोचे अनावरण झाले असून लवकरच एमबीसीसीएलमध्ये महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या कलाकारांचा खेळ पाहायला मिळणार आहे. ही एक खरीखुरी क्रिकेटची मॅच असून यात काही संघ असतील. फक्त पुरुषच नाही तर स्त्रियाही या खेळात सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून महाराष्ट्रातील विविध शहरातल्या प्रसिद्ध ठिकाणाचे नाव प्रत्येक संघाला दिले जाणार आहे. यानिमित्ताने खेळ आणि महाराष्ट्रातील वास्तुंना प्रोत्साहन दिले जाणार आहे.”

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “एमबीसीसीएलचा भाग असणे ही आमच्यासाठीही तितकीच मोठी गोष्ट आहे. एमबीसीसीएलच्या निमित्ताने सगळे कलाकार एकत्र येऊन खेळणार आहेत. प्लॅनेट मराठी अशा वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देते. मुळात क्रिकेट हा प्रत्येकाचाच आवडीचा विषय आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रीय कलाकारांना एकत्र घेऊन या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटच्या खेळाडूंना आपण नेहमीच खेळताना बघतो. अभिनय करणाऱ्या कलाकारांचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना या निमित्ताने मिळणार आहे. प्रत्येक संघात कलाकार, दिग्दर्शक, चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशा सगळ्यांचाच समावेश असेल. हळूहळू एमबीसीसीएलविषयीच्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत.”

संबंधित बातम्या

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात, ‘वारसा’ दिनानिमित्त रागडावर शुभारंभाचा प्रयोग होणार

Russia Ukraine War : युक्रेनमधल्या शरणार्थींबाबत प्रियांका चोप्राचं जगभरातील नेत्यांना आवाहन, म्हणाली…

Ayesha Takia Birthday : बॉलिवूडची क्यूट गर्ल आयेशा टाकियाचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याविषयी…

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.