Movies And Shows Releasing Today : शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! पाहा कोणते चित्रपट आणि सीरीज होणार रिलीज?

आज अर्थात शुक्रवारी (1 ऑक्टोबर) अनेक चित्रपट आणि शो रिलीज होत आहेत, त्यामुळे या आठवड्यात तुमच्याकडे मनोरंजनाचे अनेक पर्याय असणार आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे या आठवड्यात तुम्हाला वेगवेगळ्या शैलीचे चित्रपट आणि शो पाहायला मिळतील ज्यात रोमान्स, थ्रिलर, सस्पेन्स आणि हॉरर पाहायला मिळेल.

Movies And Shows Releasing Today : शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! पाहा कोणते चित्रपट आणि सीरीज होणार रिलीज?
OTT Release today

मुंबई : आज अर्थात शुक्रवारी (1 ऑक्टोबर) अनेक चित्रपट आणि शो रिलीज होत आहेत, त्यामुळे या आठवड्यात तुमच्याकडे मनोरंजनाचे अनेक पर्याय असणार आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे या आठवड्यात तुम्हाला वेगवेगळ्या शैलीचे चित्रपट आणि शो पाहायला मिळतील ज्यात रोमान्स, थ्रिलर, सस्पेन्स आणि हॉरर पाहायला मिळेल. तसेच, त्यात बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंतच्या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे.

तर आम्ही तुम्हाला आज प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची आणि शोची यादी सांगणार आहोत, ज्या पाहून तुम्ही तुमच्या वीकेंडचा आनंद घेऊ शकता. या यादीमध्ये ‘ब्रेक पॉईंट’ ते ‘बिंगो हेल’पर्यंतच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांचा समावेश आहे.

ब्रेक पॉईंट

या 7 भागांच्या मालिकेत, लिएंडर पेस आणि महेश भूपती यांची कोर्ट पार्टनरशिप दाखवण्यात आली आहे. यामध्ये बंधन, भागीदारी, मैत्री आणि मग ते दोघे कसे वेगळे झाले, हे सर्व दाखवण्यात आले आहे. नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर-तिवारी दिग्दर्शित ही मालिका तुम्ही आज ‘झी 5’वर पाहू शकता.

शिद्दत

सनी कौशल, राधिका मदन, मोहित रैना, डायना पेंटी स्टारर चित्रपट ‘शिद्दत’ आज रिलीज होत आहे. या चित्रपटात 2 जोडपी आणि त्यांच्या प्रेमाची ताकद दाखवण्यात आली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज होत आहे.

द गिल्टी

या चित्रपटात तुम्हाला एका कॉल सेंटरची कथा दाखवली जाईल. चित्रपटाचे कथानक जो बेयलर नावाच्या कॉल ऑपरेटरचे आहे. जोला एक फोन येतो त्यानंतर कथा वळण घेते. कॉलर अडचणीत आहे आणि त्या कॉलरला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आता जो त्याला वाचवू शकेल की नाही, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा चित्रपट पाहून तुम्हाला कळेल.

बिंगो हेल

गिगी सोल गुरेरो दिग्दर्शित बिंगो हेल, वेलकम टू द ब्लमहाऊस चित्रपट मालिकेतील पाचवा भाग आहे. यात वृद्ध व्यक्तींचा एक गट एकत्र राहतो हे दाखवले आहे. त्यांचा नेता लुपिता सर्वांना एका कुटुंबाप्रमाणे एकत्र ठेवतो. पण नंतर प्रत्येकाला कळते की, त्यांचा प्रिय बिंगो हॉल विकला जात आहे. यानंतर काय होते, तुम्हाला Amazon प्राईम व्हिडीओवरील चित्रपट पाहून कळेल.

मेड

मेड अॅलेक्सची कथा सांगते, एक अविवाहित आई जी एका गोंधळलेल्या नात्यातून बाहेर आली आहे. आता ती तिचे आयुष्य तिच्या मुलीसोबत नवीन पद्धतीने जगते. यामध्ये आई-मुलीचे नाते आणि गायिका आईचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मेड नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

हेही वाचा :

Sai Tamhankar : महाराष्ट्राच्या लाडक्या सईचा क्लासी अंदाज, पाहा खास फोटो

Happy Birthday Shraddha Nigam | बिपाशाच्या नवऱ्याची पहिली बायको म्हणूनही ओळखली जाते श्रद्धा निगम, वाचा अभिनेत्रीच्या काही खास गोष्टी

Manyavar Ad Controversy | आलिया भट्टची ‘कन्यामान’ जाहिरात वादात, अभिनेत्री विरोधात दाखल झाली तक्रार!

Sai Lokur : हनिमुनिंग इन मालदीव, सई लोकूर आणि तिर्थदीप रॉयचे व्हेकेशन फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI