AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॉपरमधून सुष्मिता सेनची जबरदस्त एंट्री, ‘आर्या सीझन 2’चे मोशन पोस्टर पाहिले का?

डिस्ने+ हॉटस्टारची 'आर्या' (Aarya) 2020 मधील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज बनली होती. आता शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) क्रूर लूकमधील रोमांचक टीझरने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. चाहत्यांना आगामी सीझनसाठी त्यांचा उत्साह रोखता येत नाहीये आणि त्याच वेळी मोशन पोस्टारच्या निमित्ताने सुष्मिता सेनने आर्या 2 च्या शूटमधील तिची संस्मरणीय आठवण शेअर केली.

चॉपरमधून सुष्मिता सेनची जबरदस्त एंट्री, ‘आर्या सीझन 2’चे मोशन पोस्टर पाहिले का?
Aarya
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 2:02 PM
Share

मुंबई : डिस्ने+ हॉटस्टारची ‘आर्या’ (Aarya) 2020 मधील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज बनली होती. आता शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) क्रूर लूकमधील रोमांचक टीझरने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. चाहत्यांना आगामी सीझनसाठी त्यांचा उत्साह रोखता येत नाहीये आणि त्याच वेळी मोशन पोस्टारच्या निमित्ताने सुष्मिता सेनने आर्या 2 च्या शूटमधील तिची संस्मरणीय आठवण शेअर केली.

नुकतेच या सीरीजचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये चॉपरमधून सुष्मिता सेनची जबरदस्त एंट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या खास सीनची आठवण अभिनेत्रीने शेअर केली आहे.

पाहा पोस्टर :

सुष्मिताने शेअर केली आठवण

प्रत्येक शूट हा कलाकारासाठी एक संस्मरणीय अनुभव असतो, तरीही काही क्षण असे असतात जे आयुष्यभराठी संस्मरणीय बनतात. ‘आर्या 2’मधील अशाच एका घटनेबद्दल बोलताना सुष्मिता सेन म्हणाली की, ‘जसे जसे आपण पुढे जातो आहोत, प्रेक्षकांना मेकिंग आणि प्रोसेसबद्दल सांगण्याच्या या प्रवासात अशा अनेक घटना आहेत. मात्र, हा असा एक खास सीन आहे, जो आम्ही जयपूरमधील हेलिपॅडवर शूट केला आहे. हे एक महत्त्वाचे दृश्य होते, 24 मिनिटांचा एक मोठा टेक होता, जो एकाच वेळी आणि अनेक व्हेरिएशन्ससह शूट केला गेला होता.’

…आणि जोरदार पाऊस सुरु झाला!

या सीनबद्दल अधिक माहिती देताना सुष्मिताने सांगितले की, ‘सीझन 2साठी हा एक अतिशय महत्त्वाचा सिक्वेन्स होता. तुम्हाला माहीत असेल की, राजस्थानमध्ये ऑफ सीझन पाऊस पडत नाही, मात्र 24 मिनिटांच्या या सीनमध्ये शेवटी प्रचंड गडगडाटासहित पाऊस पडला, फक्त आमच्यासाठी! आम्हाला एक अप्रतिम बॅकड्रॉप स्कोअर मिळाला आणि एनवायरमेंटल साउंडची आवड असलेले आमचे दिग्दर्शक म्हणाले की, हे यापेक्षा चांगले असूच शकत नाही. त्यामुळे, हा सीन आपल्या सर्वांसाठी हाय पॉइंट आहे आणि तो आमच्यासाठी खूप संस्मरणीय आणि खास दिवस ठरला.’

सुष्मिता सेनने ‘आर्या’द्वारे तिचे डिजिटल पदार्पण तसेच अभिनयात पुनरागमन केले आहे. राम माधवानी यांनी या सीरीजद्वारे वेब विश्वात प्रवेश केला, ज्याने याला आणखी खास बनवले आहे. सुष्मिता व्यतिरिक्त, या मालिकेत चंद्रचूर सिंग, नमित दास आणि सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि दुसऱ्या आवृत्तीत आणखी नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. ‘आर्या 2’ लवकरच डिज़्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज होणार आहे.

हेही वाचा :

प्रियांका चोप्रा-जोनासने का बदललं नाव? अखेर समोर आलं महत्त्वपूर्ण कारण, जाणून घ्या…

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आगळं वेगळं प्री-वेडिंग, शिर्के-पाटील कुटुंब रंगलं रेट्रो रंगात!

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला! कुशल बद्रिकेच्या साथीने भाऊ कदम करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.