AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anuradha Web Series | अनुराधा वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोगाने मागितला दिग्दर्शकाकडे खुलासा, नेमकं कारण काय ?

अनुराधा या वेव सिरीजच्या जाहिरातीवरच आक्षेप नोंदवण्यात आलाय. पुण्यातील अॅड.जयश्नी पालवे यांनी महिला आयोगाकडे जाहिरातीबाबत ट्विटद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडे खुलासा मागवला आहे.

Anuradha Web Series | अनुराधा वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोगाने मागितला दिग्दर्शकाकडे खुलासा, नेमकं कारण काय ?
ANURADHA WEB SERIES
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 9:04 PM
Share

मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मुख्य भूमिका असलेली अनुराधा ही वेब सिरीजची मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. या वेब सिरीजमध्ये हाताळण्यात आलेला विषय तसेच डायलॉगमुळे प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र सध्या या वेब सिरीजच्या जाहिरातीवरच आक्षेप नोंदवण्यात आलाय. पुण्यातील अॅड.जयश्नी पालवे यांनी महिला आयोगाकडे वेब सिरीजच्या जाहिरातीबाबत ट्विटद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडून खुलासा मागवला आहे.

राज्य महिला आयोगाचे पत्र, जाहिरातीबाबत मागितला खूलासा

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात अनुराधा या वेब सिरीजची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आलीय. यासाठी पुण्यात ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यामध्ये महिलेच्या हातात सिगारेट देऊन ओंगळवाणे प्रदर्शन करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत अॅड. जयश्नी पालवे यांनी राज्य महिला आयोगाला थेट ट्टीट कर तक्रार केली आहे. याच तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने अनुराधा वेब सिरीजच्या जाहिरातीबाबत खुलासा मागितला आहे. तसं पत्र आयोगाने वेब सिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवण्यात आलंय.

याआधीही वेब सिरीज बॅन लिपस्टिकमुळे चर्चेत

दरम्यान, महिला आयोगाने खुलासा मागवल्यानंतर आता दिग्दर्शक संजय जाधव काय भूमिका घेणार तसेच पुण्यातील जाहिरातबाजीवर कोणते स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीदेखील अनुराधा ही वेब सीरीज चर्चेचा विषय ठरली होती. वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी ‘माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक!’ असे म्हणत काही अभिनेत्र्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केले होते. हे व्हिडीओ नंतर व्हायरल झाले होते. तसेच अभिनेत्र्या लिपस्टिक बॅन का म्हणत आहेत असे विचारले जात होते.

वेब सिरीजमध्ये दिग्गजांचा अभिनय 

संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही 7 भागांची वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इतर बातम्या :

Jersey Film Release Date | शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, नवी तारीख काय ?

Rajesh Khanna |  ‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा बायोपिक बनणार! फराह खान सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

‘मॉनिटर’ हर्षद नायबळ आता झळकणार मालिकेत! ‘पिंकीचा विजय असो’मध्ये साकारणार ‘दिप्या’ची व्यक्तिरेखा

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.