Palak Tiwari | ‘या’ व्यक्तीचा फोटो शेअर करत पलक तिवारी हिने केले मोठे भाष्य, म्हणाली, माझी सर्वात मोठी डोकेदुखी
श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला पलक डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर हे अनेकदा मुंबईमध्ये स्पाॅट देखील होतात. यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मुंबई : श्वेता तिवारी हिची लेक अर्थात पलक तिवारी (Palak Tiwari) ही नेहमीच चर्चेत असते. पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. सलमान खान याचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये पलक तिवारी महत्वाच्या भूमिकेत होती. विशेष म्हणजे फक्त पलक तिवारीच नाही तर बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल हिने देखील या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, या चित्रपटात आपल्या अभिनयाची खास छाप सोडण्यात पलक तिवारी हिला यश मिळाले नाही. या चित्रपटाचे प्रमोशन करताना पलक दिसली.
पलक तिवारी हिने अनेक मुलाखती दिल्या. पलक तिवारी या मुलाखतींमध्ये मोठे खुलासे करताना देखील दिसली होती. पलक तिवारी हिने सांगितले की, तिची आई किती जास्त कडक आहे. जेंव्हाही तिचे नाव एखाद्या मुलासोबत जोडले जाते, त्यावेळी तिच्या आईची नेमकी प्रतिक्रिया काय असते. इतकेच नाही तर आई सतत मला बातम्या पाठवत असल्याचे सांगताना देखील पलक दिसली.
नुकताच आता पलक तिवारी हिने एक अत्यंत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पलक तिवारी हिने हा फोटो तिचा लहान भाऊ रेयांस याच्यासोबत शेअर केला आहे. पलक तिवारी हिने शेअर केलेला हा फोटो रक्षाबंधनचा आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये दोघांनी एकसारखे कपडे घातल्याचे दिसत आहे.

पलक तिवारी हिने हा फोटो शेअर करत म्हटले की, माझी हेल्थ, माझी वेल्थ आणि माझा प्राइड आणि तसेच माझी सर्वात मोठी डोकेदुखी आहे, पण ती इतर दिवसासाठी आहे. आता पलक तिवारी हिने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोकांनी पलक तिवारी हिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट देखील केल्या आहेत.
कायमच पलक तिवारी ही आपल्या आई आणि भावासोबत फोटो शेअर करताना दिसते. बाॅलिवूडमध्ये पर्दापण केल्यापासून पलक तिवारी ही सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसत आहे. पलक तिवारी हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी ही तिच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहे. पलक तिवारी ही सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर हे दोघे मुंबईमध्ये कायमच स्पाॅट होताना देखील दिसतात. मात्र, यांनी आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपवर काहीच भाष्य केले नाहीये.
