पलाश मुच्छलचा हार्दिक पांड्याच्या पूर्व पत्नीसोबतचा Video चर्चेत; कारमध्येच..

पलाश मुच्छलचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी नताशा स्टँकोविकसोबत दिसून येतोय. पलाश आणि नताशाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

पलाश मुच्छलचा हार्दिक पांड्याच्या पूर्व पत्नीसोबतचा Video चर्चेत; कारमध्येच..
पलाश मुच्छल, स्मृती मानधना आणि नताशा स्टँकोविक
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2025 | 12:44 PM

भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार, दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. जवळपास सहा वर्षांच्या डेटिंगनंतर हे दोघं 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. परंतु विवाह विधी सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर पलाशचीही प्रकृती बिघडली. या सर्व घडामोडींदरम्यान स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरील लग्नासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ काढून टाकले. तर दुसरीकडे पलाशचे कोरिओग्राफ मेरी डिकोस्टासोबत फ्लर्टिंगचे चॅट्स व्हायरल झाले. पलाशवर स्मृतीची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. अशातच त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. पलाशचा हा व्हिडीओ क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी नताशा स्टँकोविकसोबतचा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पलाश आणि नताशाचा हा व्हिडीओ जुना आहे. यामध्ये दोघं कारमध्ये डान्स करताना दिसून येत आहेत. नताशा तिच्या ‘डीजे वाले बाबू’ या गाण्यावर लिप-सिंक करत नाचतेय आणि कारमध्ये तिच्या बाजूला बसलेला पलाश तिची साथ देतोय. ‘दुनिया रखूँ जुतों के नीचे, तू कहे तो बन जाऊ डीजे’ अशा गाण्याच्या ओळी म्हणत दोघं कारमध्ये धमाल करत आहेत. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Kudiya rakhu jooto ke niche ft palash Muchhal
byu/priyansh_gif inDesiVideoMemes

पलाशवर विविध आरोप होत असताना त्याची चुलत बहीण निती टाकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावाची बाजू घेतली. नितीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘पलाश सध्या अत्यंत गंभीर टप्प्यातून जात आहे. सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही पलाशला चुकीचं समजू नका. आज टेक्नॉलॉजी माणसापेक्षा फार पुढे निघून गेली आहे. त्यामुळे लोकांनी पसरवलेल्या अफवांच्या आधारे पलाशबद्दल चुकीची मतं बनवू नका. त्याच्यासाठी प्रार्थना करा.’ तर दुसरीकडे पलाशची आई अमिता मुच्छालने लवकरच त्या दोघांचं लग्न होणार असल्याचं म्हटलंय. स्मृतीच्या वडिलांना आणि पलाशलाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. परंतु त्यांच्या लग्नाची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. 23 नोव्हेंबर रोजी हे दोघं लग्न करणार होते. सांगलीत लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली होती. परंतु विवाह विधीच्या अवघ्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.