AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमासाठी कायपण! 12 दिवसांच्या पतीने अभिनेत्रीसाठी मृत्यूपत्रात सोडले तब्बल 81 कोटी रुपये

या मृत्यूपत्रात पामेलासाठी मोठी रक्कम सोडणाऱ्या जॉनने सांगितलं की तो नेहमीच तिच्यावर प्रेम करत राहील. जॉनने तब्बल 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 81 कोटींहून अधिक रक्कम पामेलासाठी सोडली आहे.

प्रेमासाठी कायपण! 12 दिवसांच्या पतीने अभिनेत्रीसाठी मृत्यूपत्रात सोडले तब्बल 81 कोटी रुपये
हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्स आणि अभिनेत्री पामेला अँडरसनImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 29, 2023 | 12:24 PM
Share

अमेरिका: 90 च्या दशकात जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पामेला अँडरसन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पामेलाने आतापर्यंत सहा वेळा लग्न केलं आहे. तिच्या एका पूर्वाश्रमीच्या पतीने मृत्यूपत्रात पामेलासाठी खूप मोठी रक्कम सोडली आहे आणि ते सुद्धा लग्नाच्या 12 दिवसांनंतर. प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्सने 2020 मध्ये पामेलाशी लग्न केलं होतं. या दोघांचं नातं जगभरात चर्चेत आलं होतं. आता जॉनने त्याच्या मृत्यूपत्राबद्दल खुलासा केला आहे. या मृत्यूपत्रात पामेलासाठी मोठी रक्कम सोडणाऱ्या जॉनने सांगितलं की तो नेहमीच तिच्यावर प्रेम करत राहील. जॉनने तब्बल 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 81 कोटींहून अधिक रक्कम पामेलासाठी सोडली आहे.

जॉन आणि पामेलाने 1980 मध्ये एकमेकांना डेट केलं होतं. 20 जानेवारी 2020 मध्ये या दोघांच्या लग्नाचं वृत्त समोर आलं. पामेला आणि जॉनने मालिबू इथल्या एका खासगी समारंभात लग्न केल्याची माहिती समोर आली होती. पामेलाच्या पब्लिसिस्टने या वृत्ताला दुजोरा दिला होता. या दोन्ही सेलिब्रिटींच्या जीवनातील हे पाचवं लग्न होतं.

लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत पीटर्स म्हणाला, “सुंदर मुली तर सर्वत्र आहेत. मी कोणाचीही निवड करू शकलो असतो. पण 35 वर्षांपासून मी पामेलावर प्रचंड प्रेम करतोय.” मात्र पामेला आणि पीटर्सने त्यांच्या सिक्रेट लग्नानंतर मॅरेज सर्टीफिकेटसाठी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नव्हत्या.

1 फेब्रुवारी 2020 रोजी पामेलानं जाहीर केलं होतं की तिने आणी पीटर्सने त्यांच्या लग्नाच्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला थांबवलं आहे. “आम्हाला एकमेकांपासून आणि आयुष्यापासून काय हवंय याचा विचार करण्यासाठी आम्ही काही काळ वेगळे राहणार आहोत”, असं पामेला म्हणाली होती. अवघ्या 12 दिवसांत हे लग्न संपुष्टात आलं होतं.

‘व्हरायटी’ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत जॉनने मृत्यूपत्राबद्दल खुलासा केला. “मी पामेलावर नेहमीच प्रेम करीन. म्हणून मी माझ्या मृत्यूपत्रात तिच्यासाठी दहा दशलक्ष डॉलर्सची रक्कम सोडली आहे. तिला याविषयी काहीच माहीत नाही. किंबहुना हे कोणालाच माहीत नाही. मी पहिल्यांदा तुमच्यासमोर ही गोष्ट सांगत आहे. तिला या पैशांची गरज असली किंवा नसली तरी त्यावर तिचाच हक्क असेल”, असं त्याने सांगितलं.

जॉन पीटर्सच्या आधी पामेलाने रिक सॅलोमन, किड रॉक आणि टॉमी ली यांच्याशी लग्न केलं होतं. जॉनने हॉलिवूडमधल्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात बॅटमॅन, अ स्टार इज बॉर्न आणि मॅन ऑफ स्टील यांचा समावेश आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.