AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ छोट्याशा चुकीमुळे अभिनेत्याने गमावले प्राण, 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Life | अभिनेत्याला एक चूक आणि 'ही' सवय पडली महागात, गमवावे लागले प्राण... कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्याचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा सारु आहे.

'या' छोट्याशा चुकीमुळे अभिनेत्याने गमावले प्राण, 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
| Updated on: Jun 23, 2024 | 12:07 PM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पंजाबी सिनेमांमधून स्वतःची खास ओळख निर्माण करणाऱ्या एका 32 वर्षीय अभिनेत्याचं निधन झालं आहे. एका छोट्याश्या चुकीमुळे आणि सवयीमुळे अभिनेत्याने प्राण गमावले आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ज्या अभिनेत्याचं निधन झालं आहे, त्या अभिनेत्याचं नाव सिंग भंगू (Randeep Singh Bhangu Passes Away) असं आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे…

पोलिसांच्या प्राथमिक तपासात भंगू हा काही दिवसांपासून नियमितपणे दारूचे सेवन करत होता. दारूच्या नशेत असताना त्याने शेतात मोटारीवर ठेवलेली कीटकनाशकाची बाटली दारू समजून प्यायल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपण कीटकनाशक प्यायलो आहोत असं समजल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होतो. रणदीप भंगूला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केलं.

रणदीप भंगू याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्याला एक चूक आणि सतत दारू पिण्याची सवय महागात पडली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणदीप भंगू याच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

पंजाबी फिल्म अँड टीव्ही ॲक्टर्स असोसिएशनचे सरचिटणीस मलकित सिंग रौनी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रणदीप याने दारूचे सेवन वाढवले ​​होते. त्याला कशाचा तरी ताण होता. भंगूचे अकाली निधन हे पंजाबी चित्रपटसृष्टीसाठी दु:खद आहे.

रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी देखील अभिनेत्याचे प्राण वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण डॉक्टरांना यश मिळालं नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर यावर पुढील कारवाई केली जाईल. असं देखील सांगण्यात येत आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.