AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, कालव्यात सापडला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह, कुटुंबियाचा कोणावर आरोप?

5 दिवस गायब असलेल्या प्रसिद्ध गायिकेचा कालव्यात आढळला मृतदेह, अपहरणानंतर हत्या केल्याचा आरोप, कुटुंबियांनी कोणाला धरलं धरेवर? 'त्या' 5 दिवसांत नेमकं काय काय घडलं?

धक्कादायक, कालव्यात सापडला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह, कुटुंबियाचा कोणावर आरोप?
| Updated on: May 20, 2026 | 8:49 AM
Share

झगमगत्या विश्वातून कधी कोणती धक्कादायक बातमी समोर येईल सांगता येत नाही. आता देखील पंजाबी संगीत विश्वातून एक मन विचलित करणारी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायिका इंदर कौर (Inder Kaur) हिची हत्या करण्यात आली आहे आणि यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना गायिकेला श्रद्धांजली वाहिली आहे. हैराण करणारं सत्य म्हणजे, जवळपास 5 दिवसांपूर्वी गायिकेचं अपहरण करण्यात आलं होतं. आता तिचा मृतदेह एका कालव्यात आढळला आहे… जाणून घ्या नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण…

इंदर कौर हिचा कालव्यात आढळला मृतहेद

पंजाबी सिंगर इंदर कौर (Punjabi Singer Inder Kaur) उर्फ यशइंदर कौर हिची हत्या करण्यात आली आहे. 19 मे रोजी सकाळी 11 वजता इंदर हिचा मृतदेह एका कालव्यात आढळला. ज्याची ओळख कुटुंबियांनी केली. सध्या गायिकेचा मृतदेह रुग्णालयात आहे… गायिकेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदर 13 मे रोजी रात्री 8.30 वाजता कारमधून सामान घेण्यासाठी बाहेर निघाली होती. पण रात्र झाल्यानंतर देखील घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केला. पण पाच दिवसांनंतर गायिकेचा मृतदेह कालव्यात आढळला.

लग्न करण्याचे आरोप…

मिळालेल्या माहितीनुसार, इंदर कौर हिच्या कुटुंबियांचे आरोप आहेत की, सुखविंदर सिंह उर्फ सुक्खा याने इंदर हिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता, पण तिने लग्नासाठी नकार दिल्याने सुखविंदर याने मित्रांच्या मदतीने इंदर हिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिची हत्या केली. कुटुंबियांच्या मते, आरोपीने हत्येचा कट आधीच रचला होता आणि याच उद्देशाने तो नेपाळमार्गे कॅनडाहून पंजाबमध्ये पोहोचला आणि नंतर खून पुन्हा करून कॅनडाला पळून गेला.

पोलिसांवर देखील कुटुंबियांनी साधला निशाणा…

गायिकेच्या कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, 15 मे रोजी सुखविंदर सिंग आणि त्याचा साथीदार करमजीत सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, तक्रार करूनही पोलिसांनी वेळेवर कोणतीही कारवाई केली नाही. जमालपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ बलबीर सिंग यांनी सांगितल्यामनुसार, निलो कालव्यात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ओळख पटवण्यासाठी कुटुंबाला बोलावले. पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान