Shikha Malhotra | कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायू, रुग्णालयात दाखल!

Shikha Malhotra | कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायू, रुग्णालयात दाखल!

मुंबई : शाहरुख खानच्यासोबत ‘फैन’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री शिखा मल्होत्राने ​​कोरोना नुकतीच मात केली होती. मात्र आता तिला अर्धांगवायू झाला आहे. तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिखाच्या शरीराचा उजवा भाग काम करत नसल्याचे सांगितले जात आहे.(Paralyze the actress who served patients during the Corona period)

शिखाची मॅनेजर अश्विनी शुक्ला यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ‘शिखा मल्होत्रा ​​पुन्हा एकदा रुग्णालयात, तिला अर्धांगवायू झाला आहे, बोलण्यास त्रास देखील होत आहे. तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा…

शिखा मल्होत्रा संजय मिश्रासोबत 2019 मध्ये आलेला चित्रपट ‘कांचली’ मध्ये मुख्य अभिनेत्री होती. त्याशिवाय तिने ‘रनिंग शादी या चित्रपटात तापसी पन्नूबरोबर काम देखील केले आहे. शिखा मल्होत्रा अभिनेत्रीसह एक परिचारिका आहे. कोरोना काळात लॉकडाऊनच्या दरम्यान, तिने जोगेश्वरी, मुंबई येथील ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर’ येथे परिचारिका म्हणून कोरोनाच्या रूग्णांची सेवा केली. सहा महिने तिने याठिकाणी सेवा केली होती. रुग्णालयात सेवा देतानाच तिला कोरोनाची लागण लागली होती. त्यानंतर 22 ऑक्टोबरला तिने कोरोनावर मात केली होती. वृत्तानुसार गुरुवारी रात्री शिखाला घरात अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर तिला मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रूग्णालयातील महागड्या उपचारामुळे नंतर तिला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

देशात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध स्तरातून आर्थिक मदतीचा हात येताना दिसत आहे. परंतु अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिने थेट रुग्णसेवेचा पर्याय निवडला होता. जोगेश्वरीमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये शिखा ड्युटी करत होती.

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंवर शिखाचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती. ‘शिखा मल्होत्रा ही एक अभिनेत्री आहे. शिखाने संजय मिश्रा यांच्यासोबत ‘कांचली’ या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटात काम केलं आहे. जोगेश्वरीत बीएमसीच्या ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करण्यास शिखाने शुक्रवारी सुरुवात केली आहे. तिने सेवानिवृत्त डॉक्टर आणि नर्सेसनाही ‘कोरोना’विरुद्ध लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे’ असं विरलने लिहिलं होते.

‘शिखाने वर्धमान महावीर मेडीकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमधून 2014 मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रात वळल्यामुळे तिने नर्सचे काम न केले नाही’ असे पोस्टमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या :

बॉलिवूड अभिनेत्री ‘कोरोना’ग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी

(Paralyze the actress who served patients during the Corona period)

Published On - 4:42 pm, Sat, 12 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI