Parineeti chopra | पारंपरिक नाही तर, ‘असे’ असतील परिणीती – राघव यांच्या लग्नातील कपडे

Parineeti chopra | परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर... कसे असतील दोघांच्या लग्नातील कपडे? लग्नाच्या थीमबद्दल घ्या जाणून... सध्या सर्वत्र परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा, कधी अडकणार विवाहबंधनात?

Parineeti chopra | पारंपरिक नाही तर, 'असे' असतील परिणीती - राघव यांच्या लग्नातील कपडे
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 2:36 PM

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | बॉलिवूड आणि राजकारणात सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर परिणीती आणि राघव यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, परिणीती आणि राघव विवाहबंधनात कधी अडकणार? परिणीती आणि राघव दोघ्यांच्या लग्नाची थीम काय असेल? परिणीती आणि राघव यांचा लग्नातील पेहराव कसा असेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. तर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

परिणीती आणि राघव यांचं लग्न २४ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात होणार आहे. चोप्रा आणि चड्ढा कुटुंबियांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची तयारी देखील सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची तयार १७ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे लग्नात आणि लग्नापूर्वीच्या विधींना परिणीती आणि राघव कोणता पेहराव करतील याची देखील चर्चा रंगली आहे.

परिणीती आणि राघव त्यांच्या लग्नात पारंपरिक पेहराव करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. परिणीती आणि राघव त्यांच्या लग्नात लाल रंगाच्या कपड्या ऐवजी पेस्टल रंगाच्या कपड्यांना पसंती देणार आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे कार्यक्रम २३ सप्टेंबर रोजी उदयपूर याठिकाणी होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव यांचं लग्न उदयपूर याठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. लग्न उदयपूर येथील द ओबेरॉय उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहे. दरम्यान, परिणीती आणि राघव रिसेप्शन सोहळ्याची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता चाहते देखील परिणीती आणि राघव यांनी पती – पतीच्या नात्यात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा

परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला. तेव्हा अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात देखील अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. आता चाहते परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

Non Stop LIVE Update
जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद 'या' आमदारानं चिखलात लोळून लुटला
जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद 'या' आमदारानं चिखलात लोळून लुटला.
कोकणाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही..भातशेतात मोरांचा मुक्त संचार
कोकणाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही..भातशेतात मोरांचा मुक्त संचार.
रत्नागिरीत धुव्वाधार बॅटिंग, 24 तासात इतक्या पावसाची नोंद, IMDचा अलर्ट
रत्नागिरीत धुव्वाधार बॅटिंग, 24 तासात इतक्या पावसाची नोंद, IMDचा अलर्ट.
कल्याण-डोंबिवलीकरांना मुसळधार पावसानं झोडपलं, 'या' भागात गुडघाभर पाणी
कल्याण-डोंबिवलीकरांना मुसळधार पावसानं झोडपलं, 'या' भागात गुडघाभर पाणी.
राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल..; 'त्या' आरोपांवर शिरसाटांचा पलटवार
राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल..; 'त्या' आरोपांवर शिरसाटांचा पलटवार.
राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? OBC नेत्यानं...
राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? OBC नेत्यानं....
अरे भाई ये क्या है... मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलमधून पावसाच्या धारा
अरे भाई ये क्या है... मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलमधून पावसाच्या धारा.
'लाडकी बहीण'बद्दल सगळं काही... प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून..
'लाडकी बहीण'बद्दल सगळं काही... प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून...
राजकारणातील चाणाक्य कोण? शरद पवार की अजितदादा? विधानभवनासमोर झळकल बॅनर
राजकारणातील चाणाक्य कोण? शरद पवार की अजितदादा? विधानभवनासमोर झळकल बॅनर.
इगतपुरीतील धबधबे पर्यटकांना खुनावताय, बघा फेसाळणाऱ्या सूनकडाचं सौंदर्य
इगतपुरीतील धबधबे पर्यटकांना खुनावताय, बघा फेसाळणाऱ्या सूनकडाचं सौंदर्य.