Vinesh Phogat : जसं कर्म तसंच फळ… टीव्ही अभिनेत्रीचा टोला, हेमामालिनी यांनीही उडवली खिल्ली, कोण काय म्हणालं?
कुस्तीपटू विनेश फोगाट हिला वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले. अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशला अपात्र ठरवण्यात आल्याने भारताचे कुस्तीतील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मात्र टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी या संदर्भात केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. काय म्हटलं त्यांनी ?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून कुस्तीपटू विनेश फोगाट बाहेर पडल्यामुळे संपूर्ण देश निराश झाला आहे. तिचं वजन १०० ग्रॅम जास्त दाखवत असल्यामुळे ती स्पर्धेसाठी अपात्र ठरली. मंगळवारी विनेश कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर संपूर्ण देश उत्साहात होता, सुवर्ण पदकाची आशा असलेल्या देशवासियांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र बुधवारी सकाळी ती वाईट बातमी आली आणि वाढलेल्या वजनामुळे विनेशला अपात्र ठरवत स्पर्धेबाहेर जावे लागल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर लाखो चाहते तसेच अनेक सेलिब्रिटीही विनेशला पाठिंबा देताना दिसत आहेत.
मात्र काही सेलिब्रिटी तसेच टीव्ही कलाकांरानी याप्रकरणाबद्दल केलेल्या विधानामुळे ते तिची खिल्ली उडवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिचं ट्विट असो किंवा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिलेली प्रतिक्रिया असो, त्या विशनेशचं सांत्वन करतायत की टोमणा मारत आहेत, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
काय म्हणाली देवोलिना ?
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘ बिग बॉस 13 ‘मधील स्पर्धक राहिलेली देवोलिना भट्टाचार्जी ही तिच्या बिनधास्त, बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळीही तिने याप्रकरणाबाबत केलेल्या ट्विटमुळे ती चर्चेत आली आहे. विनेशच्या (उपांत्य फेरीतील) विजयाबद्दल जल्लोष करत सरकारला शिव्या देणाऱ्या लोकांवर देवोलिनाने निशाणा साधला आहे.
देवोलिनाचं ट्विट चर्चेत
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ( पूर्वीचं ट्विटर) वरील अधिकृत अकाऊंटवरून देवोलिनाने एक ट्विट केलं आहे. ‘ केली ना चुकीची गोष्ट ! विजयाचे सेलिब्रेशन न करता सरकारला शिव्या देत होतात. काय झालं ? भारताच्या मेडलला दृष्ट लागली ना ! अजूनही वेळ आहे, सुधरा… भारताबद्दल वाईट चिंतणाऱ्यांचं आजपर्यंत कधीच चांगलं झालं नाही अन् यापुढेही कधीच भलं होणार नाही. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा ! ‘ असं देवोलिनाने लिहीलं आहे.
Kar di na manushiyat waali harkat. Jeetne ka jashn naa manakar govt ko gaali de rahe the. Kya hua ? Laga di buri nazar Bharat k Medal par. Sudhar jao waqt rehte. Bharat ka bura cahne waalo ka naa aaj tak bhala hua hai aur naahi hoga kabhi. Yeh baat gaath baandh lo. #Olympic2024
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) August 7, 2024
त्यावर चाहत्याने देवोलिनाला खूप सुनावलं असून तिच्या या भूमिकेवर टीकाही केली आहे. ‘ ही दृष्ट अमेरिका, आणि चीनला का लागत नाही ? ‘ असा सवाल एका चाहत्याने तिला विचारला. त्यावरही तिने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ कारण तिकडे विजयाचे सेलिब्रेशन केले जाते. विजयाला बदल्याचे नाव दिले जात नाही. भारताबाहेरच्या शत्रूंशी नंतर लढा. आधी भारतातच जे ( शत्रू ) बसले आहेत, त्यांच्याशी लढलं तर भारताचे निम्मे प्रॉब्लेम्स संपतील, तुमची विचारसरणी , उद्देश काय आहे हे महत्वाचं ठरतं. जसं कर्म तसं फळ (मिळतं) ‘ असंही तिने लिहीलं.
Yeh buri nazar America and China walo ko kyu nhi lagti hai 🤔
— RANVEER 🔥 (@RANVEER42147927) August 7, 2024
Kyun ki wahan jeetne ka jashn manate hai. Jeet ko badle ka naam dekar maatam nahi. Bharat bahar k dushmano se baad mein lade. Pehle ho ghar k andar baithe hai unse nipatle toh India ka adha problem solve hojaye. Intention maayne rakhta hai. Jaisa karm waisa phal.
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) August 7, 2024
तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांनी विनेशच्या अपात्रतेबद्दल प्रतिक्रिया तर दिली पण त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे. अनेकांना त्यांची ही टिप्पणी अयोग्य आणि लाजिरवाणी वाटली. गोल्ड मेडल हातातून निसटल्यानंतर देशात निराशेचे वातावरण असतानाच आता हेमामालिनी यांचे विनेश फोगाटवरील वक्तव्य अनेकांना रुचले नाही. त्यांना हे विधान महागात पडू शकतं.
हेमामालिनी यांनी उडवली खिल्ली ?
विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. संसदेबाहेर आलेल्या हेमामालिनी यांनाही यासंदर्भात प्रश्व विचारण्यात आला, त्यावर त्यांनी केलेल्या विधानाची खूप चर्चा आहे. ‘ हे खूप ( निर्णय) आश्चर्यकारक आणि अजब आहे. तिला फक्त 100 ग्राम वजन जास्त असल्यामुळे अपात्र ठरवण्यात आलं. वजन नियंत्रित ठेवणं महत्वाचं आहे. हा आपणा सर्वांसाठीच एक धडा आहे. मला तिच्यासाठी वाईट वाटतंय. तिने लवकरात लवकर ते 100 ग्राम वजन कमी करावं असं मला वाटतं, पण आता ती ( पदक) जिंकू तर शकत नाही ‘ अशी प्रतिक्रिया देताना त्यांच्या चेहऱ्यावर कळत नकळत एक स्मितही दिसलं.
VIDEO | “It is very surprising, and it feels strange that she was disqualified for being 100 gm overweight. It is important to keep the weight in check. It is a lesson for all of us. I wish she should lose that 100 gm quickly but she would not get an opportunity,” says BJP leader… pic.twitter.com/9vFyl91Dll
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2024
हेमामालिनीवर लोक संतापले
ट्विटरवर हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो पाहून यूजर्स जामच भडकले . ‘ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून विनेश फोगाटला बाहेर पडावं लागल्यानंतर. भाजप खासदार हेमामालिनी तिची खिल्ली उडवत आहेत ‘ असं एका युजरने लिहीलं. तर ‘ हेमामालिनी यांच्याकडून एखादं चांगलं आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या एखाद्या वक्तव्याची अपेक्षाच नाही. ‘ असा चोलाही एका युजरने लगावला.