AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिचे तर नक्कीच दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत शरीरिक संबंध…’, ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

झगमगत्या विश्वात नव्या अभिनेत्रींना मिळत असलेल्या यशाबद्दल 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य; व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल...

'हिचे तर नक्कीच दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत शरीरिक संबंध...', 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य
| Updated on: Jun 04, 2023 | 2:54 PM
Share

मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील कलाकार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील मालिकेतील एका अभिनेत्रीने झगमगत्या विश्वात नव्या अभिनेत्रींना मिळत असलेल्या यशाबद्दल वक्तव्य केलं आहे. शिवाय इंडस्ट्रीमध्ये मुलींनी कमी वेळात यश मिळावल्यानंतर त्यांच्याकडे पाहणाऱ्यांचा दृष्टीकोन कसा असतो. याबद्दल पवित्र रिश्ता’ मालिकेतील अभिनेत्री आशा नेगी हिने वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र आशा नेगी हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा केली. दरम्यान आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांना झगमगत्या विश्वात कास्टिंग काऊचबद्दल आलेले अनुभव सांगितले आहे..

अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी सिनेमाच्या बदलेल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्यांनी केलेल्या मागणीबद्दल स्पष्ट सांगितलं. या कारणामुळे अनेक अभिनेत्रींना इंडस्ट्रीमध्ये राहून स्वतःचे स्वप्न पूर्ण करता आले नाहीत. अशात अभिनेत्री आशा नेगी हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा तुफाण रंगत आहे. इंडस्ट्री आणि लोकांच्या मानसीकतेबद्दल अभिनेत्री व्हिडीओमध्ये स्पष्ट बोलताना दिसली.

आशा नेगी म्हणाली, ‘मला असं वाटतं जर कोणत्या मुलीला लवकर यश मिळालं असेल, जरी ती मुलगी तिच्या कौशल्यामुळे यशस्वी झाली असेल, तरी लोकांना असं वाटतं.. ही मुलगीचे नक्कीच तिच्या बॉससोबत, निर्मात्यासोबत, दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध असतील. म्हणूनच तिला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली किंवा स्थान मिळालं…’ असं अभिनेत्री आशा नेगी म्हणाली..

आशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, पवित्र रिश्ता मालिकेत आशाने अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या मुलीच्या भूमिकेला न्याय दिला होता. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका चाहते आजही विसरु शकलेले नाही. मालिकेला प्रदर्शित होवून १४ वर्ष झाली आहेत. ज्यामुळे सर्वत्र मालिका आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा रंगत आहे

पवित्र रिश्ता मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, मालिका २००९ साली सुरु झाली होती. मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिकेतील अर्चना आणि मानव यांची जोडी चाहत्यांना आवडली. आजही मानव आणि अर्चना यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मालिके दरम्यान सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये प्रेम देखील बहरलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अंकिता आज पती विकी जैन याच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.