AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 3 भागांची सीरिज, पण पाहण्यासाठी अनेकांची होत नाही हिंमत, OTT वर पाहण्यासाठी उडाली झुंबड

3 भागांची अशी क्राइम सीरिज जी बघताना अंगावर येतो काटा. प्रत्येक सीन पाहून प्रेक्षकांच्या मनात येतो रांग. एकदा सुरुवात केली की लोक शेवटपर्यंत जागेवरून उठत नाही.

फक्त 3 भागांची सीरिज, पण पाहण्यासाठी अनेकांची होत नाही हिंमत, OTT वर पाहण्यासाठी उडाली झुंबड
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 06, 2026 | 3:05 PM
Share

OTT वर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि वेबसीरीज पाहायला मिळतात. क्राईम, सस्पेन्स, सायकोलॉजिकल थ्रिलर आणि तपासावर आधारित कथा प्रेक्षकांना विशेष आवडतात. अशाच गंभीर आणि हादरवून टाकणाऱ्या घटनांवर आधारित एक डॉक्युमेंट्री सीरीज म्हणजे ‘हाथरस 16 दिन’. या सीरीजमध्ये क्राईमसोबतच राजकारण, जातीय भेदभाव आणि सत्तेच्या राजकारणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत.

‘हाथरस 16 दिन’ ही 2020 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या एका तरुण दलित महिलेवरील हल्ल्याच्या तपासावर आधारित डॉक्युमेंट्री सीरीज आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान घडलेल्या घटनांचा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आढावा सीरीजमध्ये घेण्यात आला आहे.

सीरीजमध्ये ग्राउंड रिपोर्टिंग, जुन्या व्हिडीओ फुटेजसह या प्रकरणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबी दाखवण्यात आल्या आहेत. एका गुन्ह्याची कहाणी पुढे जाताना त्यामागील राजकीय सत्ता, जातीय भेदभाव आणि सामाजिक वास्तवाचे अनेक पैलू समोर येतात.

तीन एपिसोडमध्ये उलगडते संपूर्ण कहाणी

‘हाथरस 16 दिन’चे एकूण 3 एपिसोड आहेत. पहिला एपिसोड 33 मिनिटांचा, दुसरा 34 मिनिटांचा तर तिसरा एपिसोड 28 मिनिटांचा आहे. प्रत्येक एपिसोडसोबत तपासातील गंभीरता वाढत जाते आणि प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक पैलू समोर येतात.

या सीरीजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, IMDb वर तिला 7.6 रेटिंग मिळाल्याचे सांगितले जाते.

ZEE5 वर पाहता येणार सीरीज

‘हाथरस 16 दिन’चे दिग्दर्शन पॅट्रिक ग्राहम यांनी केले आहे तर समर खान आणि आदित्य पित्ती यांनी या सीरीजची निर्मिती केली आहे. यात अंजली सिवारमन, पवेल गुलाटी, कुमुद मिश्रा, तनुश्री पांडे, निधी सुरेश, अमिल भट्टनागर आणि चंद्रशेखर आझाद रावण यांसह कलाकारांचा सहभाग आहे.

गंभीर सामाजिक विषय, तपास आणि राजकीय-सामाजिक वास्तव यांचा वेध घेणाऱ्या क्राईम डॉक्युमेंट्री पाहायला आवडत असतील, तर ‘हाथरस 16 दिन’ ही सीरीज तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असायला हवी. ही सीरीज ZEE5 वर पाहता येते.

Follow Us
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम