AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पागल नाही त्यांच्या मागे फिरायला…’, सेलिब्रिटी स्वतःच पापाराझींना लोकेशन पाठवतात अन्…, ‘बॅक पोज’ आणि Oops Moment सत्य अखेर समोर

पापाराझी कल्चरबद्दल मोठं सत्य समोर आलं असून, बॉलिवूडच्या या 'स्पॉटिंग गेम'बद्दल प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफरने मोठा खुलासा केला आहे. कॅमेऱ्यात कसे कैद होतात सेलिब्रिटींचे 'बॅक पोज' आणि Oops Moment... मोठं सत्य अखरे समोर...

'पागल नाही त्यांच्या मागे फिरायला...', सेलिब्रिटी स्वतःच पापाराझींना लोकेशन पाठवतात अन्..., 'बॅक पोज' आणि Oops Moment सत्य अखेर समोर
| Updated on: Jun 29, 2026 | 2:18 PM
Share

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. जीममधून येताना, एअरपोर्टवर, लेट – नाईट पार्टीतून बाहेर पडणाऱ्या सेलिब्रिटींना पापाराझी फॉलो करत असतात. ज्यामुळे पापाराझींना प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. पापाराझी सेलिब्रिटींचे ‘बॅक पोज’ आणि Oops Moment बळजबरी कॅमेऱ्यात कैद करतात, पापाराझी सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीमध्ये दखल देतात…असं सर्वांना वाटतं, पण असं काहीही नसतं. यावर आता प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफरने थक्क करणारा खुलासा केला आहे.. ज्यामुळे बॉलिवूडच्या या ‘स्पॉटिंग गेम’चं पूर्ण सत्य समोर आलं आहे.

शैलेश पांडे यांनी स्पष्ट केलं की, यात पापाराझींची काहीही चूक नसते; उलट, खुद्द सेलिब्रिटीच या गोष्टींचे नियोजन करत असतात. शैलेश यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आम्ही काही देव नाही आहोत, कोणता सेलिब्रिटी कोणत्या विमानतळावरून किंवा रेस्टॉरंटमधून आणि किती वाजता बाहेर पडणार आहे, याचा आम्हाला काही जादूने किंवा स्वप्नातून पत्ता लागत नाही. एखादा सेलिब्रिटी नेमका कुठे आणि कधी येणार आहे, याची माहिती देणारे विशिष्ट मेसेजआम्हाला त्यांच्या पीआर टीमकडून मिळतात आणि त्यानुसारच आम्ही तिथे जाऊन त्यांचे फोटो काढतो.”

आलिया भट्टचं उदाहरण देत सांगितलं मोठं सत्य

शैलेश पांडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर एखाद्या सेलिब्रिटीने सांगितलं आम्हाला पापाराझी कल्चर आवडत नाही, तर ते हे सगळं थांबवू देखील शकतात… यावर शैलेश यांनी बॉलिवूड अभिनेत्रीचं देखील उदाहरण दिलं. शैलेश यांनी सांगितलं की, ‘आलिया भट्ट हिने स्पष्ट सांगितलं आहे की, तिला प्रत्येक ठिकाणी कॅप्चर करायचं नाही आणि पापाराझी देखील त्याच्या शब्दांचा आदर करतात…’

शैलेश पुढे म्हणाले, ‘जर कोणत्या सेलिब्रिटीला पापाराझी कल्चर आवडत नसेल तर, त्यांनी एक अधिकृत ट्विट करायला हवं… त्यानंतर कोणी पागल नाही, बळजबरी तुमचे फोटो क्लिक करेल…. सेलिब्रिटी स्वतः आम्हाला लोकेशन पाठवतात. कमीत कमी त्यांनी हे सत्य स्वीकारलं पाहिजे…’, असं देखील शैलेश पांडे म्हणाले.

पॉडकास्टदरम्यान, पापाराझींवर वारंवार संताप व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जया बच्चन यांच्याबद्दलही चर्चा झाली. त्यांनी अनेक प्रसंगी पापाराझींवर ओरडून उघडपणे राग व्यक्त केला आहे. यावर मत मांडताना शैलेश म्हणाले, जया बच्चन यांची चूक म्हणजे त्यांनी चेहऱ्यावर हास्य ठेवून केलेलं ते विधान होतं, “किमान मी तरी शॉर्ट्स घालून कामावर जात नाही.”, असं देखील शैलेश म्हणाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा