AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेटवर सेलिब्रेटींचे नखरे असतात, अहंकार… पीयूष मिश्राने केला सगळाच खुलासा, तर रणबीरबद्दलही व्यक्त केलं मत…

अभिनेता पीयूष मिश्रा यांनी बॉलिवूडमधील सेलिब्रेटींच्या सेटवरील नखरे, अहंकार आणि मागण्यांवर स्पष्टपणे भाष्य केले आहे. त्यांना दक्षिण भारतीय कलाकारांची साधेपणा आवडते, असे ते म्हणाले. रणबीर कपूरबद्दल देखील त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं आहे. त्याच्यासोबत काम करताना तो कसा वागतो हे देखील त्याने पीयूष यांनी सांगितले आहे.

सेटवर सेलिब्रेटींचे नखरे असतात, अहंकार... पीयूष मिश्राने केला सगळाच खुलासा, तर रणबीरबद्दलही व्यक्त केलं मत...
Piyush Mishra Exposes Bollywood Celebrity Ego & Tantrums, Praises Ranbir KapoorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2025 | 7:11 PM
Share

अभिनेता आणि गीतकार पीयूष मिश्रा यांनी अलीकडेच चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांच्या अनेक गोष्टींबद्दल त्यांचे मत मांडले आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत पीयूषने बॉलिवूडच्या कलाकारांबद्दलच्या अनेक धक्कादायक घटना सांगितल्या. तसेच त्यांच्या सेटवरील नखरे, डिमांड आणि त्यांच्यामुळे होणारा त्रास यासर्वांबद्दलच पीयूष अगदी स्पष्टपणेच बोलल आहे. तसेच त्यांना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करायला आवडते कारण तेथील कलाकार कोणत्याही प्रकारचे ढोंग करत नाहीत किंवा त्यांचे स्टारडम दाखवत नाहीत असं म्हणत त्यांनी त्यांचे कौतुकही केले.

“सेटवर काही कलाकार हे हँगअपमध्येच असतात”

एका मुलाखतीत पीयूष म्हणाले, “सेटवर काही कलाकार हे हँगअपमध्येच असतात. तसेच त्यांना खूप रागही येतो. त्यांचा वर्तुळ खूप मोठा असतो. त्यांच्यासोबत सुमारे 8 ते 9 लोक असतात, त्यांच्यासोबत किमान 12 बॉडीगार्ड असतात, पण मला समजत नाही की इतके बॉडीगार्ड्स का हवे आहेत? तुम्ही एकटे आहात. तुम्हाला कोण मारणार आहे? मला काही फरक पडत नाही आणि ते माझ्या बाबतीत लागू होत नाही असे नाही. माझ्याकडे एक असिस्टंट आणि एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्या दोघांनंतर, मला इतर कोणाचीही गरज नाही. इतक्या लोकांची काय गरज आहे?”

रणबीर कपूरसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? 

तसेच पीयूष यांनी इम्तियाज अलीच्या “तमाशा” चित्रपटात रणबीर कपूरसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता. हे दखील पीयूष सांगितलं आहे. ते म्हणाले, ‘रणबीरला स्टार असण्याबद्दल कोणतीही शंका नाही, जरी त्याला त्याच्या स्टारडमची पूर्ण जाणीव आहे.रणबीर अद्भुत आहे. तो कोणताही राग व्यक्त करत नाही कारण त्याला माहित आहे की तो खूप मोठा स्टार आहे. त्याला कोणतेही प्रतिबंध नाहीत. तो माझा सर्वात आवडता अभिनेता आहे. रणबीरला कधीही राग व्यक्त करताना किंवा महागडे अभिनय करताना पाहिले नाही.”असं म्हणत त्यांनी रणबीरच कौतुक केलं आहे.

दिग्दर्शक संजय गुप्ता आणि अनुराग कश्यप यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले

यापूर्वी, दिग्दर्शक संजय गुप्ता आणि अनुराग कश्यप यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. संजय यांनी देखील कोणाचेही नाव न घेता एका अभिनेत्याबद्दल सांगितले जो सहा व्हॅनिटी व्हॅनमध्ये फिरतो. ते म्हणाले होते, “मला असे काही कलाकार माहित आहेत ज्यांच्याकडे सहा मेकअप व्हॅन आहेत. हे महत्त्वाचे आहे. पहिली व्हॅन ही त्यांची वैयक्तिक जागा आहे. हे खरे आहे; मी गंभीरपणे बोलत आहे. बॉस तिथे नग्न बसतो. त्यानंतर, त्याच्या शेजारी बॉसची दुसरी व्हॅन आहे, जिथे बॉस त्याचा मेकअप आणि केस करतो. त्याच्या शेजारी व्हॅन आहे जिथे बॉस बैठका घेतात. चौथी व्हॅन आहे, जी त्याची जिम आहे. सर तिथे बाहेर व्यायाम करतात. मी म्हणालो ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा: वर्कआउट व्हॅन म्हणजे तो त्याचा ट्रेनर, त्याचा असिस्टंट, व्हॅन ड्रायव्हर आणि व्हॅनचा मेंटेनन्स मॅन आणेल. एका व्हॅनमध्ये सहा लोक असतात. मग, मेकअप, केस आणि स्टायलिस्टचे स्वतःचे असिस्टंट असतात.” अशी संपूर्ण हकीकत त्यांनी सांगितली होती.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.