Pooja Hegde | शॉर्ट कुर्ता शरारा ड्रेसमध्ये पूजा हेगडे हिचा ग्लॅमरस लूक, मेहंदी समारंभासाठी खास ड्रेस
पूजा हेगडे तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. पूजा हेगडे हिचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला. या चित्रपटात पूजा हेगडे आणि सलमान खान मुख्य भूमिकेत दिसले.

मुंबई : अभिनेत्री पूजा हेगडे हिने एक मोठा काळ साऊथ आणि बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. पूजा हेगडे (Pooja Hegde) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. पूजा हेगडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. पूजा हेगडे ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या अफेअरच्या चर्चा या जोरदार रंगताना दिसल्या.
सलमान खान पूजा हेगडे हिच्या भावाच्या एका कार्यक्रमात पोहचला. पूजा हेगडे ही काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जानमध्ये धमाका करताना दिसली. पूजा हेगडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. विशेष म्हणजे चाहत्यांना सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी प्रचंड आवडली. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने मोठा धमाका नक्कीच केलाय.
किसी का भाई किसी की जान चित्रपटातून श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल यांनी बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. पूजा हेगडे आणि सलमान खान हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनंतर पूजा हेगडे हिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळाले. मात्र, पूजा हेगडे हिने या चर्चांवर कधीच भाष्य केले नाही.

आता नुकताच पूजा हेगडे हिने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक खास फोटो शेअर केलाय. पूजा हेगडे या फोटोमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये दिसतंय. या फोटोसोबतच पूजा हेगडे हिने खास कॅप्शन देखील दिलंय. पूजा हेगडे हिने जो फोटो शेअर केल्या त्यामध्ये तिने एक अत्यंत खास असा ड्रेस घातलाय, याच ड्रेसची तूफान चर्चा रंगलीये.
पूजा हेगडे हिने आयव्हरी एम्ब्रॉयडरी अॅथनिक शॉर्ट कुर्ता शरारा ड्रेस घातलाय. या सेटवर अत्यंत बारीक असे काम करण्यात आलंय. लग्नामध्ये मेहंदीच्या कार्यक्रमात हा ड्रेस घालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. या ड्रेससोबत पूजा हेगडे हिने आपले केस मोकळे सोडल्याचे दिसतंय. या ड्रेसला गळ्याभोवती खास मिरर वर्क केल्याने हा ड्रेस सुंदर दिसतोय. या ड्रेसची किंमत 48,500 रूपये असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
