‘जेव्हा प्रेमावरचा विश्वास उडून गेला..’; पूजा सावंतच्या साखरपुड्याचा हा खास व्हिडीओ पहाच!

अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा पार पडला. यावेळी मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार उपस्थित होते. वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, गश्मीर महाजनी, फुलवा खामकर, प्रार्थना बेहरे हे सेलिब्रिटी या साखरपुड्याला उपस्थित होते.

'जेव्हा प्रेमावरचा विश्वास उडून गेला..'; पूजा सावंतच्या साखरपुड्याचा हा खास व्हिडीओ पहाच!
पूजा सावंतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 19, 2024 | 2:21 PM

मुंबई : 19 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री पूजा सावंतने नुकत्याच तिच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी तिने सिद्धेश चव्हाणशी साखरपुडा केला. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये पूजा सिद्धेशला सर्वांसमोर प्रपोज करताना दिसतेय. माझ्याशी लग्न करशील का, असं ती त्याला विचारतेय. साखरपुड्यासाठी पूजाने हिरव्या रंगाची साडी, नथ, दागिने असा सुंदर लूक केला होता. तर सिद्धेशने कुर्ता आणि धोती परिधान केली होती. यानंतर पूजा आणि सिद्धेशने पांढऱ्या रंगाच्या पोशाखाला पसंती दिली. यावेळी पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा तर सिद्धेशने त्याच रंगाची शेरवानी घातली होती.

या व्हिडीओत पूजा म्हणतेय, “जेव्हा कुठेतरी प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता, मला कधीच वाटलं नव्हतं की मी प्रेम करू शकते कोणावर इतकं. तू आलास आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. जर तू मला विचारलं नसतंस तर कदाचित मीच तुला विचारलं असतं. पण आज सर्व देवांसमक्ष आणि कुटुंबीयांसमक्ष मी विचारते, माझ्याशी लग्न करशील?”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्याला मराठी कलाविश्वातील काही मोजकी मंडळी उपस्थित होती. वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, गश्मीर महाजनी, प्रार्थना बेहरे हे सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. साखरपुड्यासाठी पूजाने हिरव्या रंगाची साडी, नथ, दागिने असा सुंदर लूक केला होता. तर सिद्धेशने कुर्ता आणि धोती परिधान केली होती. यानंतर पूजा आणि सिद्धेशने पांढऱ्या रंगाच्या पोशाखाला पसंती दिली. यावेळी पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा तर सिद्धेशने त्याच रंगाची शेरवानी घातली होती.

सिद्धेशविषयी पूजा एका मुलाखतीत म्हणाली होती, “आमचं तसं म्हणायला गेलं तर लव्ह मॅरेजच आहे. पहिल्यांदा भेटल्यापासून ते हाच माझा जोडीदार म्हणून ठरवण्यापर्यंतच्या प्रोसेसदरम्यान आम्ही अनेकदा एकमेकांना भेटत होतो. त्यावेळी एकमेकांचा स्वभाव नीट समजून घेतला. मला माझ्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सर्वांसमोर आणायला आवडत नाही. म्हणून गेली दीड वर्ष मी हे नातं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं.”

Non Stop LIVE Update
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.