AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poonam Pandey : सुनीता आहुजाच्या वक्तव्याने रंगलेल्या चर्चेत पूनम पांडेंची एन्ट्री; गोविंदाला दिला पाठिंबा

गोविंदा आणि कोमल राणी यांच्या भेटीनंतर सुनीताने केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता पूनम पांडे आणि सोमी अलीने गोविंदाला पाठिंबा दिला आहे,

Poonam Pandey : सुनीता आहुजाच्या वक्तव्याने रंगलेल्या चर्चेत पूनम पांडेंची एन्ट्री; गोविंदाला दिला पाठिंबा
अभिनेत्री पूनम पांडे दर्शवला गोविंदाला पाठिंबा
| Updated on: Aug 20, 2026 | 6:11 PM
Share

अभिनेता गोविंदा(Govinda) याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) ही कालच मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात दिसली होती. 2024 साली तिने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती, मात्र काल सुनीता हिने ती याचिका मागे घेतली. या नंतर अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा याच्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं . काही दिवसांपूर्वी गोविंदा हा त्याच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत विमानतळावर दिसला होता. त्याने स्वतः कोमलची पॅपाराझींशी ओळख करून दिली होती. त्यानंतर सुनीता आहुजा हिने केलेल्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. कोमलसोबतच्या या भेटीनंतर काही माध्यमांमध्ये तिचे नाव गोविंदांची कथित गर्लफ्रेंड म्हणूनही जोडले गेले. मात्र, गोविंदा किंवा कोमल यांनी या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या प्रकरणावर अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिने गोविंदाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे.

पूनम पांडेचा गोविंदाला सपोर्ट

सुनीता आहुजा हिच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आल्यानंतर पूनम पांडेने गोविंदाला सपोर्ट केला. गोविंदा हे मोठे स्टार आहेत आणि मी त्यांना पूर्णपणे पाठिंबा देते, जे शिव्या देतात त्यांना तर पाठिंबा देणार नाही ना मी.. असं ती म्हणाली. पूनम हिने पुढे सुनीता हिच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. गोविंदा कोणासोबत विमानतळावर दिसले, यावरून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. ते सार्वजनिक ठिकाणी कोणासोबत होते, ही साधी बाब आहे, असंही ती म्हणाली.

काय म्हणाली होती सुनीता अहुजा ?

गोविंदा आणि कोमल राणी यांच्या प्रमोशनबाबत पॅपाराझींनी सुनीता आहुजा हिला प्रश्न विचारला होता. आपल्या वयापेक्षा खूपच कमी वयाच्या अभिनेत्रीबरोबर गोविंदा दिसला, त्यावर सुनीताने नाराजी व्यक्त केली होती. मुलीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरताना थोडी तरी लाज वाटायला हवी आणि काहीतरी स्टँडर्ड असायला हवा, असं तिने उपरोधिकपणे म्हटलं होतं. मात्र सुनीता हिच्या या वक्तव्यामुळे गोविंदा आणि कोमल यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती.

सोमी अलीनेही दिला होता पाठिंबा

यापूर्वी अभिनेत्री सोमी अली हिनेही सोशल मीडियावर पोस्ट करत गोविंदाचं समर्थन केलं होतं. गोविंदा हा हिदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान आणि नम्र कलाकारांपैकी एक असल्याचं तिने म्हटलं होतं. तसेच, एखाद्या अभिनेत्याने कमी वयाच्या अभिनेत्रीबरोबर काम करण्यात काहीही गैर नसल्याचं विधानही सोमी अलीने केलं होतं. कलाकाराचं मूल्य हे त्याच्या वयावर किंवा सहकलाकाराच्या वयावर ठरत नसून त्याची प्रतिभा, व्यावसायिकता आणि काम करण्याची इच्छा यावर ठरतं, असे म्हणत तिने गोविंदाला पाठिंबा दर्शवला होता.

Follow Us
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती